जय भवानी नगर येथे पाण्याच्या टँकरने नऊ वर्षीय बालिकेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 14:43 IST2019-06-07T14:42:14+5:302019-06-07T14:43:26+5:30
टँकर अचानक मागे आला आणि मागच्या टायरखाली बालिका चिरडली गेली

जय भवानी नगर येथे पाण्याच्या टँकरने नऊ वर्षीय बालिकेला चिरडले
औरंगाबाद: जयभवानीनगर येथे पाण्याच्या टॅंकरने एका नऊ वर्षीय बालिकेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली. नेहा गौतम दंडे असे मृत बालिकेचे नाव आहे. नेहा ही जयभवानीनगर येथे बहिणीकडे पाहुणी म्हणून आई सोबत आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेहा ही जवळच्या दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती. आईस्क्रीमचा कोन घेऊन दुकानातून ती बाहेर पडली आणि त्याचवेळी मनपाचे पाण्याचे टँकर गल्लीतुन जात होता. अर्धवट भरलेल्या टॅंकर अरुंद गल्लीतून नेत असताना अचानक मागे आला आणि चिमुकली नेहा टँकरच्या मागील चाकाखाली येऊन चिरडली गेली . या घटनेनंतर टँकर सोडून चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन नेहाला घाटी रुग्णालयात हलविले.