शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निर्धार मेळाव्यातच रंगला कलगीतुरा

By admin | Updated: July 26, 2014 01:07 IST

नांदेड: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यातच

नांदेड: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यातच लोहा - कंधार मतदारसंघावर आ़ शंकरअण्णा धोंडगे व माजी आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी दावा ठोकत उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांसमोरच आपण कसे योग्य उमेदवार आहोत, हे ठासून सांगितले़ तर आ़ प्रदीप नाईक यांनी अशा भानगडीमुळेच मी नांदेडात भाषण करीत नसल्याचा टोला लगाविला़प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी स्वबळाची भाषा केली़ त्यानंतर सर्वच पदाधिकारी व आमदारांनी त्यांचीच रि ओढली़ आघाडी झाल्यास राष्ट्रवादीचेच मोठे नुकसान होणार असून स्थानिक काँग्रेस नेते आपल्याच विरोधात प्रचार करुन विरोधकांची भूमिका निभावत असल्याचेही सर्वांनी ठासून सांगितले़ तसेच नऊ मतदारसंघापैकी किमान ४ ते ५ जागा मागून घ्याव्यात अशी मागणीही केली़ यावेळी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांनी आघाडीचा फायदा अन तोटा मोठा असल्याचे सांगितले़ आघाडीचा धर्म दोन्ही बाजूने पाळला जात नसल्याचेही ते म्हणाले़ तसेच राष्ट्रवादीत गट-तट असल्याचे मान्य करीत कंधार-लोह्यामध्ये आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क सुरु केला असून सर्वात जास्त निधी खेचून आणण्यात आपल्याला यश मिळाल्याचे सांगत कंधार - लोहा मतदारसंघावर आपला दावा निश्चित केला़ त्यानंतर भाषणासाठी आलेल्या माजी आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी मी कोणाची कॉपी करत नाही, परंतु कोणी माझी कॉपी करत असेल तर काय म्हणाव? मी तालुक्यात २ हजार कोटी रुपये आणले़ त्यातून अनेक प्रकल्प मार्गी लागले़ त्यामुळे कंधार - लोह्याची जागा लागलीच पाहिजे असे म्हणत टीका केली. माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी वाटाघाटीच्या टेबलावरील लढाईत शरद पवार यांचा हातखंडा असल्याचे सांगत मतभेद विसरुन कामाला लागण्याचे आवाहन केले़ कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर आ़ प्रदीप नाईक बोलण्यास उभे राहिले़ परंतु त्यांनी या सर्वांवर कुरघोडी करीत अशा भानगडीमुळेच मी नांदेडात बोलण्याचे टाळतो असे सांगितले़ राष्ट्रवादीला ६ जागांची गरज आहे़ परंतु संधीसाठीच भानगडी होत असल्याचा खुलासाही त्यांनी केला़ दरम्यान, मेळाव्याला माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात येत होती. पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाटील आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत़ त्यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचे आवर्जुन सांगितले़ (प्रतिनिधी)