शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बसबांधणीचा पुन्हा श्रीगणेशा

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

शनिवारी काही चेसीस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच नवीन बसची निर्मिती सुरू होणार आहे.

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या दहा महिन्यांपासून ‘चेसीस’चा पुरवठा न झाल्याने नवीन बसची निर्मिती बंद होती; परंतु कार्यशाळेस नवीन ‘चेसीस’चा पुरवठा सुरू झाला असून, शनिवारी काही चेसीस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच नवीन बसची निर्मिती सुरू होणार आहे.राज्य परिवहन मंडळाच्या वतीने दापोली, नागपूर आणि औरंगाबादेतील चिकलठाणा येथील कार्यशाळेत नवीन बसची निर्मिती केली जाते. तयार झालेल्या नव्या बस राज्यभरात पाठविण्यात येतात; परंतु गेल्या वर्षभरापासून चेसीसचा पुरवठा बंद राहिल्याने चिकलठाणा कार्यशाळेत केवळ जुन्या बसच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. यामुळे उन्हाळी हंगामात आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी देण्यात येणाऱ्या नवीन बस यावेळी देण्यात खंड पडला; परंतु आता पुन्हा या ठिकाणी बसची निर्मिती पूर्ववत सुरू होणार आहे. चेसीसचा पुरवठा न झाल्याने गेल्या वर्षभरापासून अनेक मार्गांवर खिळखिळ्या झालेल्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे; परंतु आता लवकर नवीन बसबांधणी सुरू होणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर नवीन बस देण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे नवीन बसमुळे आगामी कालावधीत विविध मार्गांनी एस.टी. प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.