शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

मसणजोगी समाजाची उपेक्षा

By admin | Updated: July 25, 2014 00:31 IST

महेबूबखाँ पठाण , शिरडशहापूर स्मशानभुमीत वास्तव्य करून अंत्यविधीवेळी प्रेतांचा सांभाळ करण्याची जबाबदारी शतकानुशतके पार पाडत असलेला मसणजोगी समाज आता पारंपारिक व्यवसाय सोडून मजुरीकडे वळत आहे.

महेबूबखाँ पठाण , शिरडशहापूरस्मशानभुमीत वास्तव्य करून अंत्यविधीवेळी प्रेतांचा सांभाळ करण्याची जबाबदारी शतकानुशतके पार पाडत असलेला मसणजोगी समाज आता पारंपारिक व्यवसाय सोडून मजुरीकडे वळत आहे. परतुं या समाजाची सामाजिक व राजकीय उपेक्षा अजूनही संपलेली नाही. एका हातात माणसाची कवटी व दुसऱ्या हातात मोठी घंटा. गळ्यात कंकाल निनादणारा मोठा शंख, देवी-देवतांचे छापे असलेला विचित्र प्रकारचा झबला, डोक्यावर तुर्रेबाज पागोेटे, मळवट भरलेले लालभडक कपाळ असे भयावह रूप धारण करून मसणजोगी दारोदारी भिक्षा मागत फिरत राहिला; परंतु समाजाने किंवा शासनाने या उपेक्षित समाजाची पाहिजे तशी दखल न घेतल्याने आता आपला पारंपारिक व्यवसाय सोडून सद्यस्थितीत सामाजिक प्रवाहात सामील झाला आहे. एकीकडे मसणजोग्याच्या रौद्ररूपाला पाहून लहान मुलेच काय, मोठी माणसेही घाबरत होती. स्मशानभूमीत राहणारा म्हणजे सामान्य माणसापेक्षा काहीतरी विाचत्र प्राणी, अशी मसणजोग्याबद्दल धारणा होती. राज्यात अगदी तुरळक असणारा हा समाज शिक्षण व सरकारी सोयी-सुविधांपासून दूर आहे. मुळचा आंधप्रदेशातील हा समाज मराठवाड्यात येऊन स्थायिक झाला.हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे या समाजाची १० ते १२ घरे आहेत. त्यांच्या कुटुंबातील काही जणच आता पारंपारिक झबल्याच्या वेशात दिसतात. स्मशानभुमीत रात्रभर जागल करूनही उदरनिर्वाहासाठी पुरेसे पैसे मिळत नसल्याने व भिक्षा मागणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता आधुनिक युगाच्या प्रवाहात सामील झाल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. शासनाकडून सवलती मिळण्यासाठी औंढा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. शासनाने या समाजाचा दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांमध्ये समावेश करून त्यांना सवलती व अन्न सुरक्षा योजनेचे धान्य देण्याची मागणी या समाजाने केली आहे. शासनाने मसणजोगी समाजाची होत असलेली हेळसांड लक्षात घेऊन त्यांच्या विकासासाठी पावले उचललावीत, अशीही या समाजातील लोकांची मागणी आहे.