शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:49 IST

जिल्ह्यात सर्वत्र सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. त्यांनतर संबंधित अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सर्वत्र सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. त्यांनतर संबंधित अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.घनसावंगीमध्ये आ. राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्यासह पदाधिकारी व जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, मंठा, परतूर व जाफ्राबाद तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात युती सरकार सत्तेत आल्यापासून ३ वर्षांत राज्यामधील शेतकºयांच्या प्रश्नांवर प्रचंड आंदोलने होऊन युती सरकारने अजूनही याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत. राज्यातील शेतक-यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून जाचक अटींचा भडीमार करुन अनेक तारखा देऊनही अद्याप एकाही शेतक-याची कर्जमाफी न झालेली नाही. ही कर्जमाफी फसवी असल्याचे लक्षात आले आहे. नुकतीच शासनाची पैसेवारीवारी ५० पैशांवर असल्याचा अहवाल दिला आहे. खरिपाच्या काळामध्ये शेतक-यांचे झालेले नुकसान तसेच पीक विमा मिळण्याच्या आशा देखील पूर्णत: धुळीस मिळाल्या आहेत. त्यातच कापसाला ३१००-३२०० चा भाव मिळत असल्याने शेतक-यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याने देशात सर्वाधिक आत्महत्या केलेले राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. राज्यामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफी करुन ज्या राजाने रयतेसाठी जीवाचे रान केले अशा राजाला या सरकारने बदनाम करण्याचे काम केले. सरकारने घोषणा करुनही कर्जमाफीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. राज्यातील आॅनलाईन कर्जमाफी प्रक्रियेमध्ये आतापर्यंत राज्यातील ८९ लाख शेतक-यांपैकी फक्त ५० टक्के शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.