दुसरा विवाह करणाऱ्या नवरदेवास बिलोलीत अटक
By Admin | Updated: June 13, 2014 00:37 IST2014-06-13T00:18:17+5:302014-06-13T00:37:19+5:30
बिलोली : आपला पती दुसरा विवाह करीत असल्याची कुणकुण लागताच नांदेडहून येवून विवाह थांबवण्यापूर्वीच पूर्ण झाल्याने पहिल्या पत्नीने बिलोली पोलिसांत सासरच्या मंडळीविरूद्ध तक्रार दिली़

दुसरा विवाह करणाऱ्या नवरदेवास बिलोलीत अटक
बिलोली : आपला पती दुसरा विवाह करीत असल्याची कुणकुण लागताच नांदेडहून येवून विवाह थांबवण्यापूर्वीच पूर्ण झाल्याने पहिल्या पत्नीने बिलोली पोलिसांत सासरच्या मंडळीविरूद्ध तक्रार दिली़ प्राथमिक शिक्षिका असलेल्या पत्नीच्या तक्रारीनंतर कुंडलवाडी येथील २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नवरदेवास लग्नसमारंभातूनच अटक करण्यात आली आहे़
नांदेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका असलेल्या फिर्यादीचे १३ वर्षापूवी कुंडलवाडी येथील प्रभुकांत गंगुलवार यांच्याशी विवाह झाला़ जोडप्यास १२ वर्षाची एक मुलगी आहे़ लग्न झाल्यापासूनच सासरच्या मंडळीनी सदरील शिक्षिकेस मानसिक व शारीरिक त्रास देवून घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकत होते़ दरम्यान, मुलीचा विचार करून पहिल्या पत्नीने नकार दिला व त्रास सहन करीत होती, असे तक्रारी नमुद केले़
मंगळवारी आपला पती प्रभुकांत हा दुसरा विवाह करीत असल्याची माहिती मिळाली़ आपल्या आई-वडील व नातेवाईकांना घेवून सासर कुंडलवाडी गाठले, पण पतीसह जवळच्या नातेवाईकांच्या घराला कुलूप होते़ विचारपूस केली तेव्हा प्रभुकांतचा दुसरा विवाह लघूळ ता़ बिलोली येथे होत असल्याचे समजले़ लघूळ येथे पोहचण्यापूर्वीच दुसरा विवाह पार पडला़ पहिली पत्नी जिवंत असताना व घटस्फोटाबाबत कोणतीही प्रक्रिया झाली नसताना दुसरा विवाह केल्याची तक्रार पहिल्या शिक्षिका पत्नीने दिली़ फिर्यादीच्या तक्रारीनुसार पती प्रभुकांत गंगुलवार, सासरे दत्तराम गंगुलवार, चुलत सासरे गंगाधर गंगुलवार, सासू गंगामणी गंगुलवार, सिद्राम गंगुलवार, राजमणी गंगुलवारसह मदत करणाऱ्या २० जणांविर बिलोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)