नरेंद्र मोदींना दुष्काळग्रस्तांचा विसर - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: November 25, 2014 13:11 IST2014-11-25T12:20:38+5:302014-11-25T13:11:31+5:30

निवडणुकीदरम्यान प्रत्येक गाव पिंजून काढत लोकांवर आश्वासनांची खैरात करणा-यांना आता दुष्काळग्रस्तांचा विसर पडला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर केली आहे.

Narendra Modi forgot drought-stricken - Uddhav Thackeray | नरेंद्र मोदींना दुष्काळग्रस्तांचा विसर - उद्धव ठाकरे

नरेंद्र मोदींना दुष्काळग्रस्तांचा विसर - उद्धव ठाकरे

>ऑनलाइन लोकमत
जालना, दि. २५ - विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक गाव न गाव पिंजून काढणारे मोठमोठे नेते आता कुठे गेले? त्यांची लाट ओसरल्यावर आता फक्त कोरडा मराठवाडा उरलेला दिसत आहे, त्यांना दुष्काळग्रस्तांचा विसर पडला आहे अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सध्या मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले उद्धव ठाकरे जालना येथे बोलत होते. 
दोन महिन्यांपूर्वी राज्यात जत्रा भरलेली दिसत होती. अनेक मोठमोठे नेते आश्वासनांची खैरात करताना दिसत होते. त्यावेळी त्यांची सर्वत्र लाट होती असं म्हणतात मग आता ती लाट कुठे गेली? त्या लाटेतलं पाणी ओसरून गेल्यावर फक्त कोरडा मराठवाडाच दिसत आहे. ती मोठमोठी नेतेमंडळी आता तुम्हाला फक्त फोटोंतूनच दिसत आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
 

Web Title: Narendra Modi forgot drought-stricken - Uddhav Thackeray