शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

नर्सीत आषाढीनिमित्त भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 23:41 IST

नर्सी नामदेव : राष्ट्रसंत श्री नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या नर्सी येथे ४ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली.

रुपेश अल्हाट । लोकमत न्यूज नेटवर्कनर्सी नामदेव : राष्ट्रसंत श्री नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या नर्सी येथे ४ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली. यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या हजारो भाविकांनी संत नामदेवांचे दर्शन घेतले. प्रतिपंढरपूर म्हणून ओळख नर्सीची ओळख आहे. सर्वप्रथम आज सकाळी ६ वाजता श्रींची महापूजा प्रा.डॉ. बलबीरचंद्र राजूरकर व चंद्रकांत कोटकर या दोन दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. आ. तान्हाजी मुटकुळे, रामेश्वर शिंदे, संतोष टेकाळे, माणिक लोडे, विठ्ठल वाशिमकर, भिकूलाल बाहेती, भागवत सोळंके, खंडूजी गायवाळ व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच त्यानंतर सकाळी ६.३० वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले. सकाळपासूनच पंचक्रोशीमधून आलेल्या भाविकांचे जथेच्या जथे दाखल झाल्याने संपूर्ण रस्ते गर्दीने फुलून गेले होते. दिवसभर संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याचे चित्र दिसून येत होते.भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी दर्शन बारीची व्यवस्था केली होती. तर भाविकांना माणिक लोडे यांच्याकडून चहा व फराळाची व्यवस्था केली होती. मंदिर परिसरामध्ये मिठाई, भांडार, चहा नास्ता, फराळाचे दुकान भाजीपाल्याचे दुकान आदी दुकाने थाटल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. नामदेव फाटा - संत नामदेव मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता. उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ अधिकारी, ६१ कर्मचारी १४ महिला कर्मचारी होते. शिवाय पीटी झेड कॅमेऱ्याने परिसरातील लहान-सहान हालचालींवर लक्ष होते. तर १०० स्वयंसेवक व संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा दिवसभर परिश्रम घेतले.