शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड ४४ अंशावर

By admin | Updated: April 16, 2016 01:37 IST

नांदेड : राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून शुक्रवारी नांदेडचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले़ या वर्षातील नांदेड शहराचे सर्वाधिक तापमान आज नोंदल्या गेले़

नांदेड : राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून शुक्रवारी नांदेडचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले़ या वर्षातील नांदेड शहराचे सर्वाधिक तापमान आज नोंदल्या गेले़ एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून शहराचे तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस असे नोंदत होते़ मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे़ त्यामुळे उष्णतेने नागरिकांच्या जीवाची काहिली होत आहे़ वाढत्या उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना रात्रीला सुद्धा गरम झळांचा सामना करावा लागत आहे़ यंदा दुष्काळामुळे उन्हाच्या चटक्यांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे़ पाणी व चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता स्थलांतरीत होत आहेत़ दुसरीकडे शहरातही उन्हाच्या प्रकोपाने दैनंदिन व्यापारावर परिणाम झाला आहे़ सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसत आहेत़ उन्हामुळे दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिक बाहेर जाणे टाळत आहेत़ त्यामुळे शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत़ लग्नसराई असतानाही बाजारपेठेतील ग्राहकांची वर्दळ मंदावलेली दिसत आहे़ नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी रूमाल, चष्मा वापरत आाहेत़ तसेच लिंबु शरबत, लस्सी, ज्युस, उसाचा रस आदी थंड पेय घेत आहेत़ त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ज्युस सेंटर, रसवंतीगृहावर वर्दळ दिसत आहे़ गेल्या दोन, तीन दिवसांपासून शहराचे तापमान ४२, ४३ अंश सेल्सिअसवर नोंदत होते़ शुक्रवारी यावर्षीचे सर्वाधिक तापमान ४४़० अंश नोंदल्या गेल्याची माहिती हवामान विभागाचे निरिक्षक बालासाहेब कच्छवे यांनी दिली़ साथरोग अधिकारी डॉ़ दुर्गादास रोडे यांनी सांगितले, प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून महिन्यात उष्माघाताचा प्रादूर्भाव होत असतो़ राज्यात विदर्भ व मराठवाड्यात उष्माघाताचा प्रादूर्भाव प्रामुख्याने आढळतो़ उष्माघातापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेत प्रत्येकाने जागरूक राहण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)