शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

नळगीर ग्रामसभेत अन्नसुरक्षेचे ‘कालवण’

By admin | Updated: August 24, 2014 00:20 IST

उदगीर : तालुक्यातील नळगीर येथील अन्न सुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेपासून वंचित पात्र लाभार्थींनी त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीत

उदगीर : तालुक्यातील नळगीर येथील अन्न सुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेपासून वंचित पात्र लाभार्थींनी त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीत जोरदार हंगामा केला़ ग्रामस्थांची ही भावना लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तात्काळ याबाबत ठराव घेतला व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे लेखी पत्राद्वारे केली़ नळगीर येथील बहुतांश पात्र लाभार्थी हे शासनाच्या अन्नसुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेपासून वंचित राहिले आहेत़ या योजनेत समाविष्ट करुन घेण्यात यावे, यासाठी या नागरिकांची सातत्याने धडपड सुरु आहे़ परंतु, त्यांना कोठेही दाद मिळत नसल्याचे व्यथा मांडत नागरिकांनी ग्रामसभेत जोरदार हंगामा केला़ गरजू व पात्र लाभार्थींनी इन कॅमेरा पार पडलेल्या ग्रामसभेत अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींच्या यादीत निवृत्त कर्मचारी, जमीन, जुमला, घर असलेल्या कुटूंबांचा तसेच एकाच कुटूंबातील एकाच शिधापत्रिकेतील व्यक्तीची वेगवेगळी कुटूंबे दाखवून त्यांचा समावेश करण्यात आल्याचा दावा केला़ नळगीर येथील काही स्वस्त धान्य दुकानाकडून समाधानकारक यादी न झाल्यामुळे बरेच लाभार्थी हे या दोन्ही महत्वपूर्ण योजनेपासून वंचित राहिले आहेत़ याबाबतची चौकशी करुन कारवाई करावी व वंचित लाभार्थींंना या दोन्ही योजनेत समाविष्ट करुन त्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी नळगीर ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मलाबाई लक्ष्मण सोनवळे व ग्रामविकास अधिकारी एम़ व्ही़ सुर्यवंशी यांनी गुरुवारी उदगीरच्या तहसीलदारांकडे केली आहे़ लाभार्थींची बाजू घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असला तरी त्याचा पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे लाभार्थींनी व्यक्त केले़ (वार्ताहर) सातत्याने पाठपुरावा करुनही आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोपही लाभार्थींनी केला आहे़ त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने या सभेत सर्वानुमते ठराव संमत केला़