शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदाराच्या श्रीमुखात भडकावली

By admin | Updated: May 27, 2015 00:41 IST

केज : सुटीवर गावी आलेल्या सैनिकाने महिला नायब तहसीलदाराच्या श्रीमुखात भडकाविल्याचा खळबळजनक प्रकार येथील तहसील कार्यालयात घडला. या प्रकरणी पोलिसांनी सैनिकाला अटक केली आहे.

केज : सुटीवर गावी आलेल्या सैनिकाने महिला नायब तहसीलदाराच्या श्रीमुखात भडकाविल्याचा खळबळजनक प्रकार येथील तहसील कार्यालयात घडला. या प्रकरणी पोलिसांनी सैनिकाला अटक केली आहे. नायब तहसीलदार आशा वाघ या तहसील कार्यालयामध्ये नित्याप्रमाणे आपल्या दालनात काम करत होत्या. यावेळी सैन्यदलात कार्यरत व तरनळी येथील रहिवासी रोहिदास खामकर हे आले. हयातीच्या प्रमाणपत्राची त्यांनी नायब तहसीलदार वाघ यांच्याकडे मागणी केली. त्यासाठी पत्नीला समक्ष हजर करा, असे आदेश वाघ यांनी सोडले. त्यानंतर खामकर व वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. संतप्त खामकर यांनी नायब तहसीलदार वाघ यांच्यावर हात उचलला. त्यांच्या गालावर चापट मारल्यानंतर इतर कर्मचारी धावले. काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. फौजदार आनंदराव वाटोरे हे फौजफाटा घेऊन तहसीलमध्ये दाखल झाले. त्यांनी खामकर यांना ताब्यात घेतले. आशा वाघ यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा, मारहाण करणे, धमक्या देणे या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. सैन्यदलाकडे अहवाल पाठवू, असे निरीक्षक नानासाहेब लकाळ म्हणाले.(वार्ताहर)नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.४बुधवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात येणार आहे. ४शासकीय व निमशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी असुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्ष़ेसाठी प्रशासनाने उपाय करण्याची मागणी मानवी हक्क अभियानच्या सीता बन्सोड यांनी केली आहे.