शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नागापूरला अशुद्ध पाणीपुरवठा !

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

परळी: परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर धरणाखालील नागापुरातच अर्धवट नळ योजनेमुळे पाण्याची समस्या उद्भवत आहे

परळी: परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर धरणाखालील नागापुरातच अर्धवट नळ योजनेमुळे पाण्याची समस्या उद्भवत आहे तर गावात येणारे पाणी अशुद्ध येत असल्याने नागापूरकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नागापूर या गावची लोकसंख्या ८ हजार असून ८०० घरे आहेत. गावाशेजारीच नागापूर धरण आहे. या धरणातून परळी शहराला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या नागापूर धरणाशेजारी राहणाऱ्या ८ हजार लोकांना मात्र शुद्ध पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ६० वर्षांपूर्वीचीच पाणीपुरवठा अर्ध्या गावात आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर धनगरवस्ती, नागापूर कॅम्प या भागातील लोकांच्या घशाला कोरड असल्याची तक्रार या भागातील नागरिकांची आहे. तर गावात शुद्ध पाणीपुरवठा होत नाही, जुन्या पद्धतीनेच रेतीचा वापर करुन शुद्ध पाणीपुरवठा अर्ध्या नागापूरला केला जातो आहे.जलशुद्धीकरण रेंगाळलेजलस्वराज्य योजनेचे काम मागील १० वर्षांपासून अर्धवट आहे. येथील जलस्वराज्य योजना समिती वादग्रस्त झाली होती. त्यामुळे हे काम रेंगाळलेलेच आहे. या धरणातून नागापूरसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प व्हावा, अशी मागणी तत्कालीन सरपंच मोहन सोळंके यांनी केली आहे. नागापूरच्या नदीपात्रातून पाण्याच्या जुन्या टाकीत होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध आहे. याऐवजी धरणातील न.प.च्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून नागापूरच्या टाकीत पाणी सोडावे, अशी मागणी सोळंके यांनी केली.शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणीनागापुरातील जलस्वराज्य योजनेचे अर्धवट काम पूर्ण करावेवाढीव पाणीपुरवठा योजना सुरू करावीनागापूरकरांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रभूअप्पा तोंडारे यांनी केली आहे.