शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नॅक, अकॅडमिक ऑडिट, भौतिक सुविधांची कसोटी; ३१ मार्चपूर्वी महाविद्यालयांची तिहेरी परीक्षा

By योगेश पायघन | Updated: January 26, 2023 07:50 IST

या तिहेरी कसोटीत उत्तीर्ण काॅलेजलाच संलग्नीकरण मिळणार

औरंगाबाद : पुढील शैक्षणिक वर्षांच्या सलग्नीकरणासाठी महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच प्रत्येक महाविद्यालयाला अकॅडमिक ऑडिट करणे अनिवार्य असणार आहे. भौतिक सुविधांसंदर्भात ६२ महाविद्यालयांची तपासणी सध्या सुरू असून, त्या महाविद्यालयांसह यापूर्वी प्रवेशबंदी आणि दंडात्मक कारवाई झालेल्या २३ महाविद्यालयांनी भौतिक आणि शैक्षणिक सुविधांच्या त्रुटींची पूर्तता ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावी. या तीन कसोट्यांतून उत्तीर्ण महाविद्यालयांनाच पुढील शैक्षणिक वर्षाचे संलग्नीकरण विद्यापीठ देईल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

भाैतिक व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी विद्यापीठाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. नॅक, अकॅडमिक ऑडिटसाठी उच्च शिक्षण विभागासह विद्यापीठ वारंवार महाविद्यालयांना आवाहन करीत आहे. भौतिक सुविधांसह गुणात्मक शिक्षणासाठी महाविद्यालयांकडे विद्यापीठानेही लक्ष केंद्रित केले आहे. सुविधा देऊन संलग्नीकरणाचे सर्व निकष पूर्ण करतील त्याच महाविद्यालयांना विद्यापीठ पुढील शैक्षणिक वर्षासाठी संलग्नीकरण देईल. या वर्षी ४८५ महाविद्यालये संलग्नित आहेत. पुढील वर्षीच्या संलग्नीकरणासाठी महाविद्यालयांना नॅक, अकॅडमिक ऑडिट, भौतिक सुविधा पडताळणीच्या तिन्ही कसोट्या पूर्ण कराव्या लागणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी ठामपणे सांगितले.

६२ काॅलेजची तपासणी सुरू, १० अहवाल प्राप्तविद्यापीठ कार्यक्षेत्रातील १० वर्षांपेक्षा जुन्या महाविद्यालयात प्राचार्य, प्राध्यापक, भौतिक सुविधा नाहीत, त्यांची तपासणी करीत आहोत. पहिल्या टप्प्यात २३ आणि आता ३९ अशा ६२ महाविद्यालयांची तपासणी कुलगुरूंच्या अधिकारात होत आहे. भाैतिक सुविधांच्या पडताळणी समितीतील काही प्राध्यापक परीक्षा आणि मूल्यमापनात व्यस्त असून, ३० जानेवारीपर्यंत तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १० महाविद्यालयांचे अहवाल आले. त्यांची सुनावणी घेऊन त्रुटीपूर्ततेची शेवटची संधी देऊ. शैक्षणिक सत्र सुरू असल्याने कारवाई करणार नाही, असे कुलगुरू म्हणाले.

प्रत्येक महाविद्यालयाला अकॅडमिक ऑडिट अनिवार्यप्रत्येक महाविद्यालयाचे शैक्षणिक अंकेक्षण अनिवार्य असणार आहे. ज्यांचे अकॅडमिक ऑडिट होणार नाही, त्या महाविद्यालयांना २०२३-२४ मध्ये संलग्नीकरण मिळणार नाही.

कारवाई झालेल्या २३ महाविद्यालयांना अल्टिमेटमकुलगुरूंनी गेल्या वर्षी २३ महाविद्यालयांना प्रवेशबंदीसह २ लाखांची दंडात्मक कारवाई केली. त्या महाविद्यालयांनी हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत त्रुटीपूर्तता करणे अपेक्षित आहे. त्यांना ३१ मार्चपर्यंत त्रुटीपूर्ततेचा शेवटचा अल्टिमेटम देण्याचे आदेश कुलगुरूंनी शैक्षणिक विभागाला दिले आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण