शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

अठरापगड जातीसाठी माझा लढा

By admin | Updated: September 23, 2014 01:36 IST

सेलू : मराठा समाजापुरता माझा लढा नसून अठरापगड जातींना सोबत घेवून त्यांचा विकास साधण्यासाठी आपण घराबाहेर पडलो आहोत़

सेलू : मराठा समाजापुरता माझा लढा नसून अठरापगड जातींना सोबत घेवून त्यांचा विकास साधण्यासाठी आपण घराबाहेर पडलो आहोत़ येत्या काळात या समाजाला न्याय देण्यासाठी आपला लढा सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले़ शहरातील नगरपालिकेच्या श्री साई नाट्यमंदिरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित मराठा आरक्षण कृतज्ञता सोहळयात ते रविवारी बोलत होते़ अध्यक्षस्थानी प्रा़ डॉ़ उत्तम पानपट्टे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ़ रामप्रसाद बोर्डीकर, बाळू महाराज गिरगांवकर, पवन आडळकर, बी़ एस़ कोलते , जनार्दन पाटील, बालाजी शिंदे, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य छगन शेरे, अशोक भोसले यांची उपस्थिती होती़ संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे ; परंतु या आरक्षणाचा उपयोग तुमच्या परिश्रमावर अवलंबून आहे़ त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवा़ जानेवारी महिन्यात काढलेल्या शिव-शाहू यात्रेत मराठवाडा, विदर्भ, खान्देश या भागातील समाजबांधवांचे मोठे प्रेम मिळाले आहे़ मराठा समाजाची मोठया भावाची भूमिका असल्यामुळे अठरा- पगड जातींना सोबत घेवून काम करण्याची गरज आहे़ इतर समाज आपल्या पासून दुखवणार नाही, याचीही काळजी समाजाने घेतली पाहिजे़ जातीभेद नष्ट करण्यासाठी माझा प्रवास आहे़ मी जरी शिवाजी महाराजांच्या रक्ताचा वारसदार असलो तरी मला त्यांच्या विचारांचा वारसदार म्हणून ओळखले पाहिजे म्हणून मी बहुजन समाजापर्यंत शिवशाहूंचे विचार पोहोचविण्याचे काम करीत आहे़ तसेच मराठा समाजाला दिशा व प्रबोधन करण्याची गरज आहे़ माझ्या पेक्षा माझी रयत मोठी झाली पाहिजे या भावनेतून आपला लढा सुरूच राहणार असल्याची संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केले़ सूत्रसंचालन बजरंग आरकुले यांनी केले़ रणजित चव्हाण यांनी आभार मानले़ कार्यक्रमासाठी रामेश्वर शेरे, महेश मुसळे, शशांक टाके, सचिन रोडगे, अरूण काष्टे, विक्रम पवार, संतोष शिंदे, शिवाजी मोकाटे, श्रीराम डासाळकर, शिवाजी पांचाळ, राहुल मेहता, अतिश आळणे, अमोल शेवाळे, संदीप डाके आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)