मनपाला उत्तरानगरीच माहीत नाही

By Admin | Updated: September 10, 2014 00:52 IST2014-09-10T00:29:47+5:302014-09-10T00:52:42+5:30

औरंगाबाद : वॉर्ड २२ नारेगाव- ब्रिजवाडी येथील उत्तरानगरीत पाच वर्षांत गजबज झाली असून, मनपाकडे सर्व कर अदा करण्यात या नागरिकांनी कुठेही कसर सोडलेली नाही.

The municipality does not know the answer | मनपाला उत्तरानगरीच माहीत नाही

मनपाला उत्तरानगरीच माहीत नाही

औरंगाबाद : वॉर्ड २२ नारेगाव- ब्रिजवाडी येथील उत्तरानगरीत पाच वर्षांत गजबज झाली असून, मनपाकडे सर्व कर अदा करण्यात या नागरिकांनी कुठेही कसर सोडलेली नाही. तरीदेखील येथील रस्ते, पाणी, वीज इत्यादी प्रश्नांवर विचार करतेवेळी मनपा विचारते ही वसाहत कुठे आहे. याने नागरिकांना धक्काच बसला आहे.
औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या या उत्तरानगरीत प्रदूषणाचा त्रास असून, कारखान्यातील सांडपाण्याचे पाझर बोअरला येत असल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. त्या पाण्यात क्षार अधिक असल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत आहे. बिल्डर्सने जलवाहिनी टाकलेली असली तरी मनपाने तिला आपली जलवाहिनी जोडली नसल्याने नागरिकांना खाजगी कारखान्यातून पाण्याचे जार विकत आणून आपली तहान भागवावी लागते.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी जोर धरीत आहे. विजेच्या खांबावरील दिव्यांची वाट लागली असून, रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. मनपाने येथील समस्यांची सोडवणूक करावी; अन्यथा कर न भरण्याचा पवित्रा नागरिकांच्या वतीने नागेश गजभिये, किशोर पाराशर, खैरनार, विजय गवळी, नीलेश देशमुख, अरविंद शिंदे, बी.आर. तांबे आदींनी घेतला आहे.

Web Title: The municipality does not know the answer