शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

महापालिकेचा कचऱ्यावरील खर्च ७ कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 7:42 PM

कचऱ्याच्या नावावर महापालिकेची उधळण सुरूच असल्याचे समोर आले आहे. 

औरंगाबाद : महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची नियुक्ती केली. खासगी कंपनीची नियुक्ती केल्यानंतर महापालिकेची आर्थिक बचत होईल, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये कचरा संकलनावर १७ कोटी रुपये खर्च झाला आहे. खाजगी कंपनी नियुक्त करण्यापूर्वी हा खर्च फक्त १० कोटी रुपये होता. कचऱ्याच्या नावावर महापालिकेची उधळण सुरूच असल्याचे समोर आले आहे. 

कचऱ्यावरील खर्च नेमका कोठे वाढला याचे चिंतन महापालिका प्रशासन करायला तयार नाही. कचऱ्याच्या आड खाबुगिरी तर वाढली नाही? याचा शोधही प्रशासन घ्यायला तयार नाही. महापालिकेतर्फे घन कचरा व्यवस्थापनावर मागील वर्षापर्यंत ६० कोटी रुपये खर्च केले जात होते. खासगीकरण केल्यानंतर हा खर्च कमी होईल, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. खर्च कमी होण्याऐवजी वाढल्याचे समोर आले आहे. मुख्य लेखा परीक्षक दीपाराणी देवतराज यांनी महापालिकेच्या प्रमुख विभागांच्या खर्चाचा तपशील सादर केला आहे. त्यात कचरा संकलनासाठीचा खर्च १० कोटींवरून १७ कोटींवर गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. गतवर्षी १ फेब्रुवारी ते ३१ आॅक्टोबर २०१८ या काळात कचरा संकलनावर १० कोटी ८८ लाख ५१ हजार ७०३ रुपये खर्च झाले होते. आता फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेने पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीमार्फत काम सुरू केले आहे. त्यामुळे खर्च तब्बल सात कोटींनी वाढला आहे. फेब्रुवारी ते आॅक्टोबर २०१९ या काळात १७ कोटी १९ लाख ५५ हजार ३८० रुपये खर्च झाल्याचे या अहवालात नमूद  आहे. देवतराज यांनी या खर्चाचा तपशील महापौरांना सादर केला आहे. 

प्रकल्पांवर ११ कोटींचा खर्चराज्य शासनाच्या अनुदानातून चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल व पडेगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत. पडेगाव वगळता तीन प्रकल्पांवर ११ कोटी ६० लाख ५१ हजार ७०८ रुपयांचा खर्च झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

खर्च आणखी वाढणारमनपा अ‍ॅक्टिव्हा या खाजगी कंपनीच्या सहकार्याने कचऱ्याचे संकलन, वाहतूक करीत होती. या कंपनीच्या रिक्षा बंद करण्यात आल्या. एकाच झोनमध्ये या कंपनीचे काम सुरू आहे. आठ झोनमध्ये बंगळुरू येथील कंपनी काम करीत आहे. भविष्यात कंपनीकडून खर्च आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादTaxकरfundsनिधी