शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सिटी बसच्या निविदेवर होणार शिक्कामोर्तब

By admin | Updated: April 24, 2015 00:38 IST

लातूर : गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चा असलेल्या लातूर शहर बससेवेला (सिटी बस) मूर्तरुप मिळणार असून, सिटी बस चालविण्यासाठी आलेल्या प्रस्तावावर स्थायीच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे

लातूर : गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चा असलेल्या लातूर शहर बससेवेला (सिटी बस) मूर्तरुप मिळणार असून, सिटी बस चालविण्यासाठी आलेल्या प्रस्तावावर स्थायीच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. याशिवाय, हातगाडे खरेदीचा प्रस्तावही या बैठकीत मांडण्यात आला आहे. यापूर्वी मनपाकडे असलेल्या हातगाड्यांचा थांगपत्ताही नाही. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत लातूर शहराला गतवर्षी सिटी बसची मंजुरी मिळाली. गेल्या वर्षभरापासून लातूरकरांना सिटी बसची आस लागली आहे. खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ती यशस्वीपणे चालविण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सदर निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे. शुक्रवारी सभापती पप्पू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या स्थायीच्या बैठकीत सिटी बससह अन्य विषयांनाही मंजुरी देण्यात येणार आहे. यात प्रभाग क्र. १३ मधील सुभेदार रामजी नगर येथे असलेल्या सामाजिक सभागृहाच्या दुरुस्तीसाठी ४ लाखांचा निधी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर महापालिकेकडे कचरा उचलणे व अन्य कामांसाठी हातगाडे नसल्याने ते खरेदी करण्याचा प्रस्तावही बैठकीत घेण्यात येणार आहे. तत्कालीन नगरपालिकेने हातगाडे खरेदी केले होते. मात्र सदरील हातगाडे नेमके भंगारात आहेत की, अन्य कुठे? याचा शोध घेण्याची गरज आहे. याशिवाय, मानधनावर असलेल्या आरोग्याधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा विषयही स्थायीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.आरोग्याधिकारी महेश पाटील यांनी आपल्याला असलेले मानधन अत्यंत तुटपुंजे असून गेल्या काही वर्षांपासून आपण काम करीत असल्याचे अर्जात म्हटले आहे. त्यामुळे किमान ४० हजार रुपये प्रतिमाह मानधन मिळावे, अशी मागणी त्यांनी केल्यामुळे हा विषय स्थायीत ठेवण्यात आला आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचा कांगावा करणारी मनपा यावर काय निर्णय घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी)