शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

वाघाळ्यातील आश्रमशाळेस महापालिकेने ठोकले सील

By admin | Updated: May 24, 2014 00:45 IST

नांदेड : महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे वाघाळ्यातील आश्रमशाळेला शुक्रवारी सील ठोकण्यात आले़

नांदेड : महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे वाघाळ्यातील आश्रमशाळेला शुक्रवारी सील ठोकण्यात आले़ सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गुलाम सादेख यांच्या विशेष वसुली पथकाने ही कारवाई केली़ चंपानगर, वाघाळा येथील मालमत्ताधारक भगवान बाबाराव इंगेवाड यांच्या आश्रमशाळेची मालमत्तेपोटी ३ लाख २ हजार ५२० रूपयांचा कर येणे बाकी होते़ शुक्रवारी त्यांच्याकडे करवसुली व जप्ती पथक गेल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा करण्यास प्रतिसाद दिला नाही़ त्यामुळे त्यांच्या आश्रमशाळेला सील ठोकण्यात आले़ पाच दिवसांत संबंधितांनी त्यांच्याकडील कर न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांना दिलेल्या महापालिकेच्या सुविधा बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला़ इतर मालमत्ताधारकांनीही आपल्याकडील मालमत्ता कर भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे़ या मोहिमेत भालचंद्र चामे, पद्माकर कावळे, अ़ हबीब, मारूती चव्हाण, सुखदेव जोंधळे, व्यंकट गायकवाड, मालु एनफळे, सुरेश हिंंबरकर, व्यंकटी पटणे, सूर्यकांत रणवीरकर, संजय भालेराव या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला़ (प्रतिनिधी)