शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

शेतकऱ्यांचे जायकवाडीतून बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:45 IST

जलसमाधी घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना काठावर अडवून स्थानबद्ध केले यामुळे मोठा अनर्थ टळला.

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडीतून बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात जलसमाधी घेण्याचा ईशारा शेतकऱ्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस व जिल्हा प्रशासनाने सकाळ पासून डाव्या कालव्यावर तगडा बंदोबस्त ठेवत जलसमाधी घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना काठावर अडवून स्थानबद्ध केले यामुळे मोठा अनर्थ टळला. आक्रमक शेतकरी व पोलीस प्रशासनात या दरम्यान बऱ्याच वेळा शाब्दिक चकमकी उडाल्या. आंदोलन दरम्यान पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्याने आंदोलनाची तीव्रता कमी झाली.

तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडी धरणातुन पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी आज पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाव्या कालव्या जवळ  जलसमाधी आंदोलन केले. पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासह संपूर्ण गोदावरी चे पात्र कोरडे पडल्याने जवळपास ४० गावात पाणीबाणी निर्माण झाली होती. शेतातील पिकांचे भवितव्य धोक्यात आले होते. त्यातच जायकवाडीतून दोन्ही कालव्या द्वारे पाणी सोडण्यात आल्याने पैठण तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले होते.  आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी  पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली होती.

डावा कालवा परिसरात जमलेल्या शेतकऱ्यांनी जयाजी सुर्यवंशी, माऊली मुळे व किशोर दसपुते यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत डाव्या कालव्याकडे आगेकूच केली. शेतकरी कालव्यात उडी मारण्या अगोदरच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, फौजदार राहुल पाटील आदींनी  अडवले. या वेळी तहसीलदार महेश सावंत, जायकवाडीचे उप कार्यकारी अभियंता खेडकर, जगताप, संदिप राठोड यांनी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेत पाणी सोडण्याचे आदेश झाले असल्याचे सांगितले. जवळपास दोन तास सुरू असलेल्या आंदोलनात हनुमान बेळगे, एकनाथ कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ, लक्ष्मण लांडगे, मकबुल पठाण, नंदकिशोर गोर्डे, बाळासाहेब जाधव, मुस्ताक पठाण, सलीम पठाण, आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

उद्या सोडणार पाणी 

जायकवाडी धरणातून उद्या दि ८ रोजी जलविद्युत प्रकल्पाच्या मोरीतून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे पत्र कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी जाहीर केले, तहसीलदार महेश सावंत यांनी पत्र आंदोलकांना दिले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांची भाजपा युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे, तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, लक्ष्मण औटे, डॉ सुनील शिंदे, कल्याण गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, अनंत औटे, आबा मोरे, सुरेश दुबाले, प्रल्हाद औटे, कांतराव औटे आदींनी भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.या नुसार खा. दानवे यांनी पाणी सोडण्याचे पत्र दि ४ रोजी जलसंपदा मंत्र्यांना दिले होते आज या बाबत दानवे यांनी शासनाकडून आदेश पारीत करून घेतले असे आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. दरम्यान पाणी सोडण्यात यावे या साठी आमदार संदीपान भुमरे, आमदार राजेश टोपे, जयाजी सुर्यवंशी, रामप्रसाद खराद, जिल्हाधिकारी जालना, औरंगाबाद व विभागीय आयुक्त यांनीही पत्र दिले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनWaterपाणी