शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

असह्य वेदनेतून मुक्तीसाठी तीनवर्षीय मुलीला गळफास देऊन मातेने स्वतःही केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 11:29 IST

जन्मजात आजारामुळे असह्य त्रासाने विव्हळणाऱ्या आपल्या साडेतीनवर्षीय चिमुरडीला साडीने गळफास देऊन मातेने तिची मुक्तता केली

ठळक मुद्देजन्मापासूनच आजार असल्याने मुलगी असह्य वेदनाने त्रस्त असे मुलीचा होणारा त्रास पाहून आई बैचैन होई

औरंगाबाद : जन्मजात आजारामुळे असह्य त्रासाने विव्हळणाऱ्या आपल्या साडेतीनवर्षीय चिमुरडीला साडीने गळफास देऊन मातेने तिची मुक्तता केली आणि नंतर स्वत: गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी बेगमपुऱ्यात घडली. स्वत:च्या वाढदिवसालाच विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

अमृता किशोर मुळे (२४, रा. बेगमपुरा) आणि अवंतिका किशोर मुळे (साडेतीन वर्षे), अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, बोबडेवाडी (ता.केज, जि. बीड) येथील अमृता आणि बेगमपुऱ्यातील किशोर यांचा विवाह २०१४ साली झाला. या दाम्पत्याला २०१५ साली अवंतिका ही मुलगी झाली. अवंतिकाला जन्मापासूनच आजार असल्याने तिच्यावर सतत उपचार करावे लागत होते. अवंतिका या आजारामुळे चिडचिड आणि रडारड करायची. अवंतिकाला होणारा त्रास पाहून अमृता बेचैन होई.

रविवारी दुपारी अमृता आणि अवंतिका यांनी जेवण केले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अमृता आणि अवंतिका पहिल्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत होते. तब्येत ठीक नसल्याने अमृताचा पती किशोर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आराम करीत होते. चार वाजेच्या सुमारास किशोर झोपेतून उठले. जेवण करायचे असल्याने त्यांनी अमृताला उठविण्यासाठी खोलीचे दार ठोठावले; मात्र तिने आतून प्रतिसाद न दिल्याने ती झोपली असेल, असे समजून ते स्वयंपाक खोलीत जाऊन बसले. अर्धा ते पाऊण तासानंतर किशोरसह अन्य नातेवाईकांनी खोलीचे दार ठोठावले, मात्र अमृता आणि अवंतिका प्रतिसाद देत नसल्यामुळे सर्वांनी मिळून सव्वापाच वाजेच्या सुमारास दार तोडले. तेव्हा अमृता आणि अवंतिका या माय-लेकी गळफास घेतलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेल्या दिसल्या.

या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद बदक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर माय-लेकीचे मृतदेह घाटी रुग्णालयात हलविले.

...तर टळली असती घटनाअमृताचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. तिचा पतीही पदवीधर असून, तो खाजगी वाहनचालक आहे. नोकरी मिळणे अवघड झाल्याने अमृताने काही दिवसांपूर्वीच शिवणक्लास लावला. ती रोज दुपारी एक ते तीन शिवणक्लासला जात असे. रविवारी सुटी असल्याने ती घरीच होती. तिचा जर आज शिवणक्लास असता तर चिमुकलीचा खून करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा विचार तिच्या डोक्यात आला नसता आणि आजची घटना टळली असती, असे तिचे सासरे सहायक उपनिरीक्षक  दिलीप मुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :MurderखूनSuicideआत्महत्याFamilyपरिवार