धावत्या रेल्वेतून माय-लेक पडले; दीड वर्षाच्या मुलाचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:52 IST2019-05-20T17:52:06+5:302019-05-20T17:52:57+5:30
अत्यंत वेगात ते खाली पडल्याने दोघेही जबरदस्त जखमी झाले

धावत्या रेल्वेतून माय-लेक पडले; दीड वर्षाच्या मुलाचा झाला मृत्यू
वैजापूर (औरंगाबाद ) : धावत्या रेल्वेतून माय-लेक पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारी रोटेगाव ते तारूर लोहमार्गावर घडली. या अपघातात दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून महिला गंभीररीत्या जखमी झाली.
वैशाली संतोष लाटे (२३, रा. हिरवळ, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर मृत बालकाचे नाव मयंक असे आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज दुपारी वैशाली लाटे या आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत मराठवाडा एक्स्प्रेसने मनमाडकडे जात होत्या. रोटेगाव-तारूर दरम्यान हे दोघेही धावत्या रेल्वेतून अचानक खाली पडले. अत्यंत वेगात ते खाली पडल्याने दोघांना जबरदस्त लागला व ते गंभीर जखमी झाले.
यानंतर पानवी खुर्द येथील पोलीस पाटील बाळासाहेब सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील दोघांना उपचारासाठी वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी मुलाला तपासून मृत घोषित केले. जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले.