शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

औरंगाबादमधील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 15:17 IST

मशीनमध्ये टाकताच काही तासांत संपतात नोटा

औरंगाबाद : बँकेची एजंट कंपनी सकाळीच एटीएममध्ये नोटा भरतात व अवघ्या काही तासांत ते रिकामे होऊन जाते. यामुळे नागरिकांना एका एटीएमवरून दुसऱ्या एटीएमवर चकरा माराव्या लागत आहेत. ही सत्य परिस्थिती असतानाही बँकेचे अधिकारी मात्र, नोटा टंचाई नसल्याचे सांगत आहेत. तांत्रिक कारणांमुळे नोटा एटीएममधून निघत नसल्याचे सांगितले जात आहे. कारण, काही असले तरी एटीएम कार्डधारकांना त्रास होत आहे. 

रिझर्व्ह बँकेने शहरासाठी मार्च महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या होत्या. तरी पण, एप्रिलच्या पहिल्या तारखेपासूनच एटीएममध्ये खडखडाट जाणवू लागला आहे. आजही अनेक अधिकारी, कर्मचारी आपला पगार एटीएममधूनच काढतात. त्यातही अनेक जण एकदम पगार काढत नाहीत. आवश्यकतेनुसार एटीएममधून रक्कम काढली जाते.  सध्या महिनाअखेरचे दिवस सुरू आहेत. आता लग्नसराई व अन्य कामासाठी पैसे लागतात. यामुळे नागरिकांच्या एटीएममध्ये चकरा वाढल्या आहेत. पण सिडको, एमजीएम रोड, हडको, पुंडलिकनगर, गारखेडा रोड, उल्कानगरी, झांबड इस्टेट रस्ता, रेल्वेस्टेशन रस्ता, बीड बायपास याठिकाणी आमच्या प्रतिनिधीने फिरून माहिती घेतली असता, अनेक एटीएममधून नागरिक खाली हात बाहेर पडत असल्याचे दिसून आले. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकांचे काही एटीएम वगळता अन्य  एटीएममध्ये दुपारनंतर खडखडाट निर्माण झाला होता.

एसबीआयचे एटीएम विभागाचे अधिकारी सर्व एटीएममध्ये दररोज नोटा भरल्या जात असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना मात्र रोख रकमेसाठी भटकावे लागत आहे. शहरात व आसपासच्या परिसरात सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँकांचे मिळून ७०० एटीएम आहेत. त्यातील किमान ६० टक्के एटीएममध्ये नोटा नसल्याचे आढळून येत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, रिझर्व्ह बँकेने नागपूर येथून मार्च महिन्यातच शहरातील बँकांच्या पाच करन्सी चेस्टमध्ये सुमारे ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या होत्या. त्यातील काही रक्कम  एटीएमसाठी दिली जाते. पहिले बँकेत काऊंटरवर येणाऱ्या ग्राहकांना प्राधान्य दिले जाते. एका एटीएममध्ये ३० लाख रुपयांच्या नोटा बसतात.  

एटीएममध्ये एकदाच भरली जाते रक्कम बँकेच्या व्यवस्थापकाने सांगितले की, बँकांनी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम आऊटसोर्सिंगद्वारे होते. ज्या एजन्सीज्ला काम दिले त्या दिवसातून एकदाच एटीएममध्ये नोटा भरतात. त्यानंतर दिवसभर त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. यामुळे एटीएममध्ये नोटा संपल्या तर दुसऱ्या दिवशीच त्या भरल्या जातात. यामुळे खडखडाट जाणवत आहे. 

काही एटीएममध्ये तांत्रिक बिघाड शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ एटीएम असे आहेत की, त्यात तांत्रिक बिघाड होऊन मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद पडले आहेत. याविषयी एटीएम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एटीएम दुरुस्त करण्याची प्रक्रिया मोठी आहे. बँक व्यवस्थापक त्याची माहिती मुख्यालयाला कळवितात. तेथून संबंधित आऊटसोर्सिंग एजन्सीला कळविले जाते. ती एजन्सी इंजिनिअरला पाठविते व एटीएमची तपासणी करून खर्चाची यादी देते. त्यानुसार टेंडर काढले जातात व नंतर एटीएमची दुरुस्ती केली जाते. यास अनेक दिवस लागतात.

टॅग्स :atmएटीएमMONEYपैसाbankबँक