शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेला अधिकाऱ्यांकडून खिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:26 IST

उस्मानाबाद : लघू उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी मुद्रा बँकेचे उद्घाटन केले.

उस्मानाबाद : लघू उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी मुद्रा बँकेचे उद्घाटन केले. मुद्रा योजनेत शिशू, किशोर आणि तरुण या गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, कुठलेही तारण किंवा जामीनदार न घेता या योजनेअंतर्गत कर्ज वितरण करणे अपेक्षित आहे. असे असताना जिल्ह्यातील अनेक बँकांकडून मात्र कुठले ना कुठले कारण देवून ग्राहकांना हे कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसत आहे. याच अनुषंगाने सोमवारी जिल्ह्यातील विविध बँक शाखांत प्रतिनिधींनी या योजनेअंतर्गत कर्ज मागणी केली प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले. काही बँकांनी सध्या शेतकऱ्यांचे अनुदान वितरणाचे काम चालू असल्याचे तर काहींनी मार्च एन्डचे कारण सांगून नंतर येण्याचा सल्ला दिला. काही ठिकाणी तर उद्दिष्ट संपल्याचे सांगण्यात आले असून, तुळजापूरच्या एका शाखेत तर तसा फलकही डकविण्यात आला आहे.उद्दिष्ट संपले...कळंब : येथील प्रतिनिधीने दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शाखाधिकारी पी. एन. काळे यांची भेट घेऊन या योजनेअंतर्गत कर्जाची मागणी केली. यावेळी त्यांनी उद्दिष्ट संपल्याचे सांगितले. यावेळी प्रतिनिधी व शाखाधिकारी यांच्यात झालेला हा संवाद.४प्रतिनिधी : साहेब, मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज हवे आहे.४मॅनेजर : बंद आहे४प्रतिनिधी : कधी बंद झाले४मॅनेजर : उद्दिष्ट संपले४प्रतिनिधी : किती उद्दिष्ट होते४मॅनेजर : ते सांगू शकत नाही४प्रतिनिधी : का ?४मॅनेजर : त्यासाठी माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज द्या४ मॅनेजर : आपण कोण? (यावेळी प्रतिनिधीने आपली ओळख दाखविल्यानंतर व्यवस्थापकांनी सावध पवित्रा घेतला)४मॅनेजर : दोन प्रकरणांचे उद्दिष्ट होते. वाटप केले. ४प्रतिनिधी : यासंदर्भातील उद्दिष्ट कोण देते? कोणत्या शासकीय यंत्रणेचे यावर नियंत्रण आहे?४मॅनेजर : माहिती नाही. ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील स्टेट बँक आॅफ हैैदराबाद शाखेत बँकेत खाते असलेल्याच एका ग्राहकास मुद्रा योजनेच्या कर्ज मागणीसाठी पाठविले असता तेथील शाखाधिकाऱ्यांनी या वर्षीचे टार्गेट संपले असून, एप्रिलनंतर या, असे सांगून परत पाठविले. यासंदर्भात प्रतिनिधीने शाखाधिकारी सुधीर झा यांच्याशी संपर्क साधला असता बँकेने मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत १७ शिशू, ९ किशोर आणि एक तरुण अशा २७ जणांना २० लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असल्याचे सांगितले. बँकेची कर्ज वाटप मर्यादा आठ कोटीची असताना आतापर्यंत नऊ कोटींचे वाटप केले आहे. शिवाय सध्या शेतकरी अनुदान वाटपाचे काम सुरू असून, कर्मचारी संख्याही कमी आहे. त्यामुळे तूर्त कर्जवाटप थांबविले असल्योचे ते म्हणाले.