शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आजोबा आणि ड्रायव्हरनेच केला दोन चिमुकल्यांचा विनयभंग

By admin | Updated: October 15, 2016 01:21 IST

औरंगाबाद : बालकांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये जवळच्या व्यक्तीच अधिक असतात, असे वारंवार सिद्ध झालेले आहे.

औरंगाबाद : बालकांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये जवळच्या व्यक्तीच अधिक असतात, असे वारंवार सिद्ध झालेले आहे. अशाच एका घटनेत सिडको एन-३ सारख्या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींची त्यांचे आजोबा आणि शाळेत सोडणाऱ्या वाहनचालकानेच त्यांची छेड काढल्याचे समोर आले. याप्रकरणी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तीन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक जाधव असे वाहनचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार दोन्ही बहिणींचे अनुक्रमे वय १५ आणि १२ वर्षे आहे. मोठी मुलगी दहावीत शिकत आहे. त्यांचे वडील २०१३ मध्ये मरण पावले. जानेवारीत त्यांच्या आईने प्रेमविवाह केला. तेव्हापासून त्या चिमुकल्यांचे आजी-आजोबा आणि दोन आत्या त्या राहत असलेल्या घरात राहण्यासाठी आल्या आहेत. त्यांच्या आईने प्रेमविवाह केल्याबाबत त्यांना टोमणे मारले जाते. एवढेच नव्हे तर आजोबा हा त्यांच्यासमोर कपडे बदलताना भान ठेवत नाही. तसेच त्या मुलींना शाळेत ने-आण करणारा अशोक जाधव नावाचा वाहनचालकही त्यांच्यावर वाईट नजर ठेवून होता. मुली कपडे बदलत असताना त्यांना तो चोरून पाहत असे, मोठ्या मुलीस दुचाकी चालविण्यास सांगून मागे बसायचा आणि तिच्या शरीरास स्पर्श करायचा. याबाबतची माहिती या दोन्ही बहिणींनी आजी आणि दोन्ही आत्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी याबाबत कोठेही वाच्यता करू नका, असे म्हणून त्यांना गप्प राहण्यास भाग पाडले.