शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसाला ७५ वेळा फोन करणारा विकृत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:54 IST

शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर एकदा नव्हे तर तब्बल ७५ ते ८० वेळा कॉल करून महिला पोलीस कर्मचाºयाला शिवीगाळ करून अश्लील बोलणाºया विकृतास शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पैठण तालुक्यातील रहाटगाव येथून पकडून आणले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर एकदा नव्हे तर तब्बल ७५ ते ८० वेळा कॉल करून महिला पोलीस कर्मचाºयाला शिवीगाळ करून अश्लील बोलणाºया विकृतास शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पैठण तालुक्यातील रहाटगाव येथून पकडून आणले. गुरुवारी (दि़ ७) दुपारी पावणेबारा ते पाचदरम्यान आरोपी हा रहाटगाव येथील शेतातून शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांना फोन करायचा.छगनदेव कारभारी डोईफोडे (२१, रा़ रहाटगाव) असे आरोपीचे नाव आहे़ अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या सेवेसाठी शहर पोलिसांचा नियंत्रण कक्ष रात्रंदिवस सुरू असतो. नियंत्रण कक्षाच्या १०० हा टोल फ्री नंबर आहे. यासोबतच २२४० ५०० हासुद्धा पोलीस नियंत्रण क क्षाचा क्रमांक आहे. जनतेला तातडीने मदत मिळावी, त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या महिला पोलीस आणि कर्मचारी तेथे रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात. गुरुवारी दुपारी ११.४५ वाजेच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाच्या १०० नंबरवर एका अनोळखी मोबाइल क्रमांकावर कॉल आला. तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाºयाने हा फोन उचलला. तेव्हा फोन करणारा व्यक्ती त्याचे नाव सांगत नव्हता. उलट तो महिला पोलीस कर्मचारी यांच्याशीच अश्लील बोलत होता. तो दारू पिलेला असावा म्हणून महिला कर्मचाºयांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून फोन ठेवून दिला. यानंतर त्या व्यक्तीकडून एकानंतर एक सारखे फोन येऊ लागले आणि तो महिला पोलिसांना घाणेरड्या भाषेत बोलू लागला. पोलिसांनी त्यास समजावून सांगितले. प्रसंगी आम्ही पोलीस असून तुला पकडू, जेलमध्ये डांबू असे धमकावलेही, मात्र त्याचा कोणताही परिणाम त्याच्यावर झाला नाही. एकदा नव्हे तर तब्बल ७५ ते ८० वेळा त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केले. यामुळे वैतागलेल्या महिला कर्मचाºयाने हा प्रकार पोेलीस उपायुक्त डॉ़ दीपाली घाटे- घाडगे यांना सांगीतला. घाडगे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना बोलावून आरोपीला हजर करण्याचे आदेश दिले.