मोबाईल बदलून देण्याचे आदेश

By Admin | Updated: June 13, 2015 23:52 IST2015-06-13T23:52:48+5:302015-06-13T23:52:48+5:30

उस्मानाबाद : ग्राहकाला मोबाईल बदलून देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने इन्टेक्स टेक्नॉलॉजीज कंपनीला दिले़

Mobile Change Order | मोबाईल बदलून देण्याचे आदेश

मोबाईल बदलून देण्याचे आदेश


उस्मानाबाद : ग्राहकाला मोबाईल बदलून देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने इन्टेक्स टेक्नॉलॉजीज कंपनीला दिले़
अ‍ॅड. वडगावकर यांनी दिलेली माहिती अशी की, उमरगा येथील अ‍ॅड़ नंदकिशोर सूर्यकांत बिराजदार यांनी उमरगा येथील तुलसी मोबाईल शोरूममधून इन्टेक्स टेक्नोलॉजीजच कंपनीचा हॅन्डसेट १० मार्च २०१३ रोजी खरेदी केला होता़ त्यानंतर मोबाईल हॅन्डसेटमध्ये बिघाड झाला होता़ त्यानंतर बिराजदार यांनी सदरील मोबाईल हॅन्डसेट बदलून मिळावा, यासाठी तुळजापूर येथील इन्टेक्स टेक्नोलॉजीजची सेवा पुरविणाऱ्या जाकीर मोबाईल्स यांच्याकडे मोबाईल जमा करून पाठपुरावा सुरू केला होता़ मात्र, तरीही हँन्डसेटची दुरूस्ती झाली नाही व तो बदलूनही दिला नाही़ त्यानंतर अ‍ॅड़ बिराजदार यांनी अ‍ॅड़ देविदास वडगावकर यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती़ या तक्रारीची अध्यक्ष एम़व्हीक़ुलकर्णी, सदस्य विद्युलता दलभंजन, मुकुंद सस्ते यांच्या समोर सुनावणी झाली़ सुनावणीवेळी समोर आलेले पुरावे व अ‍ॅड़ वडगावकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून ग्राहक मंचाने इन्टेक्स टेक्नोलॉजीज कंपनीने ग्राहकाला मोबाईल बदलून द्यावा किंवा त्याची रक्कम द्यावी, असे आदेश दिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Mobile Change Order