मनसेच्या 'या' मोठ्या नेत्याला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 16:28 IST2020-03-11T16:28:09+5:302020-03-11T16:28:45+5:30
एका टपरी चालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनसेच्या 'या' मोठ्या नेत्याला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
औरंगाबाद : राजकरणात नेहमीच चर्चेत असलेले माजी आमदार तथा मनसेचे महत्वाचे नेते हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भूखंडाशेजारी टपरी लावल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून जाधव यांच्याविरुद्ध गेल्या आठवड्यात ॲट्रासिटी कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे या याप्रकरणी जाधवांना कोणत्याहीक्षणी अटक केली जाऊ शकते.
एका टपरी चालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर अटक टाळण्यासाठी जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, या प्रकरणी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे जाधव यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन जाधव यांच्या प्लॉटसमोर उभा केलेल्या पान टपरीवरून हा वाद झाला होता. त्यावेळी जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला गेला. परंतु, हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले. 'हे तर माझ्याविरोधातील राजकीय षडयंत्र आहे. मी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.