शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

औरंगाबाद : शहरात १,५०० कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा गवगवा करणाऱ्या महापालिकेने विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवले आहे.

औरंगाबाद : शहरात १,५०० कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा गवगवा करणाऱ्या महापालिकेने विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवले आहे. गेल्या आठवड्यातच ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना गणवेश मिळलेले नसून ३४ लाख रुपयांची खर्चमंजुरी मनपाने दिलेली नाही. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानातील १२ हजार विद्यार्थ्यांना एकेक गणवेश मिळाला. उर्वरित ८ हजार विद्यार्थी मात्र गणवेशाची प्रतीक्षा करीत आहेत. १५ आॅगस्ट रोजी मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत या दिशेने पालिका दरवर्षी निर्णय घेते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत बीपीएलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळत असत. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत. यासाठी पालिकेच्या फंडातून तरतूद करण्याचा निर्णय घेतला; परंतु तरतूद केलेली रक्कम कागदावरच राहिल्यामुळे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. मनपा शाळेतील २० टक्के विद्यार्थी ‘ढ’ राहिले आहेत. ‘ढ’ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली होती. ते विद्यार्थी हुशार झाले नाहीत तर शिक्षकांच्या वेतनवाढी कायमस्वरूपी थांबविण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांनी दिले होते. मात्र, आयुक्त जाताच तो आदेश मागे घेण्यात आला आहे. वेतनवाढ थांबविण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा वेतनवाढ देण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी ए.एम. शेख यांनी सांगितले. जे विद्यार्थी ‘ढ’ राहिले आहेत. त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली असल्याचे त्यांनी सांगितले.