शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

बदलानंतर चुका थांबल्या

By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST

औरंगाबाद : परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्यानंतर परीक्षेत होणाऱ्या चुका थांबल्या

औरंगाबाद : परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्यानंतर परीक्षेत होणाऱ्या चुका थांबल्या. आता चारही जिल्ह्यांत परीक्षा सुरळीत असल्याची ग्वाही परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली. दरम्यान, बी.एस्सी.च्या सहाव्या सत्राची प्राणिशास्त्र विषयाची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार अद्याप झालेली नाही. ती उद्या बुधवारी व त्यानंतर शनिवारी असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’शी बोलताना परीक्षा नियंत्रक डॉ. गायकवाड म्हणाले की, २७ आॅक्टोबरपासून पदवी, तर अलीकडच्या आठवड्याात पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्या. सुरुवातीला केमिस्ट्रीच्या पेपर सेटच्या कोडची खातरजमा न करताच ते पेपर केंद्रावर पाठविल्यामुळे जुन्या अभ्यासक्रमाचे पेपर विद्यार्थ्यांना मिळाले. ही बाब गांभीर्याने घेत परीक्षा विभागाने कसलाही विलंब न लावता तात्काळ मेलद्वारे दुसरे पेपर केंद्रांना पाठविले. या चुका नेमक्या कशामुळे झाल्या, याची तातडीने चौकशी केली, तेव्हा परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार घडल्याचे लक्षात आले, त्यामुळे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या आदेशान्वये परीक्षा विभागातील चार कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. तेव्हापासून आजपर्यंत परीक्षा प्रक्रियेत कसलीही चूक झालेली नाही. सर्वत्र परीक्षा व्यवस्थित सुरू आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सहकेंद्र प्रमुख प्रश्नपत्रिका व अन्य परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे भरारी पथकेही गांभीर्याने सर्व केंद्रांना भेटी देत आहेत. बी.एस्सी.च्या परीक्षेत कसलाही गोंधळ झालेला नाही. तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्राच्या प्राणिशास्त्र विषयाची परीक्षा अद्याप झालेली नाही. नियोजित वेळापत्रकानुसार ती उद्या बुधवारी व शनिवारी होणार आहे. प्राणिशास्त्र विषयाचे पेपर नजरचुकीने फोडले की कसे, याची खातरजमा करण्यासाठी मंगळवारी डॉ. संभाजी वाघमारे यांच्या भरारी पथकाला वैजापूर येथे, तर प्रा. संजय सांभाळकर यांच्या पथकाला सोयगाव येथे पाठवले. तेव्हा त्याठिकाणी ते पेपर कस्टडीत सीलबंद आढळून आले.