शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

'राष्ट्रपती राजवट लावल्यास राज्यातील जनता पेटून उठेल'; ठाकरे सरकारने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 17:25 IST

राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

औरंगाबाद- राणा दाम्पत्यावर केलेल्या कारवाईवर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. देशात लोकशाही आहे. कोणी हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येत असेल, तर विरोध का, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच तसेच एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा, असा प्रकार राज्यात सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला मागे नेल्याची टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे.

पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचं आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहिती नाही. ८९ हजार कोटींचा तूट आहे. राज्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली आहे. 

राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.  विरोधकांचे आता सर्व उपाय संपले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न दिसत आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यांनी आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

राज्यात भाजपा रडीचा डाव खेळत असून, मात्र याला महाविकास आघाडी सरकार घाबरत नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम राज ठाकरे करीत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांना परवानगी कशी द्यायची, असा प्रश्‍न पोलीस प्रशासनासमोर उभा राहतो, असं जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी