आजपासून मिनी लॉकडाऊन; पाचच्या आत घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:03 IST2021-06-29T04:03:56+5:302021-06-29T04:03:56+5:30

जिल्ह्यात १४ तास संचारबंदी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची ...

Mini lockdown from today; In the house within five | आजपासून मिनी लॉकडाऊन; पाचच्या आत घरात

आजपासून मिनी लॉकडाऊन; पाचच्या आत घरात

जिल्ह्यात १४ तास संचारबंदी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. २१ दिवसांत शहर आणि ८ दिवसांत जिल्ह्यात २९ जूनपासून सकाळी ७ दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहाराला परवानगी दिली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंंत जमावबंदी आणि नंतर सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.

सर्व काही सुरळीत झाल्याचे दिसत असतानाच पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियम, अटींचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही १०० टक्के बंद राहील, असे आदेशात म्हटले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिकुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी संयुक्तरीत्या मिनी लॉकडाऊनबाबत सोमवारी सायंकाळी आदेश जारी केले.

२८ रोजी महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची पॉझिटिव्ह टक्केवारी १.३१ टक्के होती. ऑक्सिजन बेडवर ६.३९ टक्के रुग्णांची नोंद होती. ग्रामीण भागातील रुग्णांची पॉझिटिव्हिटी २.५९ टक्के तर ऑक्सिजन बेडवर २.९६ टक्के रुग्ण असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. २९ जूनपासून शहर व जिल्ह्याला तिसऱ्या स्तरातील वेळेची बंधने लागू झाली आहेत.

शहरासह जिल्ह्यातील ‘नाईटलाईफ’ वर पुन्हा बंधने

तिसऱ्या टप्प्यात शहर-जिल्ह्याचा समावेश मंगळवारपासून करण्यात आला असून, मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी केंद्र सोमवार ते शुक्रवार ५० टक्के डायनिंग क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर पार्सल सुविधा सुरू राहील. तर शनिवार, रविवार फक्त पार्सल सुविधा सुरू राहणार असल्याने ‘नाईटलाईफ’वर बंधने आली आहेत.

सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बाग, सायकलिंग, मॉर्निंग वॉकसाठी सकाळी ५ ते ९ पर्यंत परवानगी आहे. खासगी आस्थापना सर्व नियम पाळून १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यासह शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये नियमांसह १०० टक्के सुरू राहण्यास दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी आहे. क्रीडांगणे सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत (स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी) सुरू राहतील. चित्रीकरण, स्रेहसंमेलन, सामाजिक, सांस्कृतिक करमणुकीच्या कार्यक्रमांना दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसाठी परवानगी दिली आहे. सभा, निवडणुका, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्थांच्या आमसभांना ५० टक्के उपस्थितीत सर्व नियम पाळून परवानगी आहे. बांधकाम, कृषीसंबंधित सर्व बाबी दुपारी ४ वाजेपर्यंत, ई-कॉमर्स सेवा रोज पूर्णवेळ सुरू राहील. जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहील.

विवाहाला ५० टक्के क्षमतेने परवानगी

विवाह समांरभांना ५० टक्के गर्दीला परवानगी असेल. तर अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत करावा लागेल. क्रीडासंकुल, खुले व हॉटेल संलग्न जलतरण तलाव पूर्णपणे बंद राहतील.

पर्यटनाला मुभा; आठवडी बाजार भरणार, धार्मिक स्थळे बंद

पर्यटनस्थळांना सकाळच्या सत्रात ५०० आणि दुपारच्या सत्रात ५०० पर्यटकांना प्रवेशाची परवानगी असणार आहे. सोबतच शहर व जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविण्यास परवानगी असणार आहे. बाजारात विक्रीस येणाऱ्यांना कोरोना लस घेणे बंधनकारक असेल. जत्रा, यात्रा, दिंडी, धार्मिक स्थळे बंद राहतील. मोर्चे-धरणे, आंदोलने करता येणार नाहीत.

सार्वजनिक वाहतूक, उद्योगांना सवलत

सार्वजनिक वाहतुकीला परवानगी असणार आहे. पाचव्या स्तरातील जिल्ह्यातून औरंगाबादेत येणाऱ्या प्रवाशांना ई-पास आवश्यक असेल. तसेच उद्योगांना मिनी लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. शासकीय कार्यालये, बँका, अत्यावश्यक सेवेतील, औषधनिर्मिती, विमा कंपन्यांची, कार्यालये, सर्व वित्त संस्थांना लॉकडाऊनमधून सूट दिली आहे. उद्योगातील कर्मचारी, कामगारांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बाळगणे बंधनकारक असणार आहे.

अत्यावश्यक सेवेत या बाबींचा समावेश

सर्व वैद्यकीय सेवा, वाहतूक, पशुवैद्यकीय सेवा, सर्व वने संबंधित बाबी, हवाई सेवा, जीवनावश्यक वस्तू व सेवा, गोदाम, शीतगृहे, वृत्तपत्रे व माध्यमे, सार्वजनिक वाहतूक, आरबीआयने घोषित केलेल्या सेवा, दूरसंचार, मालवाहतूक, पाणीपुरवठा, शेतीसाहित्य, पेट्रोलपंप, आयटी सेंटर्स व सेवा, वीज, गॅसपुरवठा, एटीएम, पोस्ट सेवा, शासकीय, खासगी सुरक्षा सेवा, ऑटोमोबाईल्स या अत्यावश्यक सेवा आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने दररोज सकाळी ७ ते सायं. ४ पर्यंत सुरू राहतील.

Web Title: Mini lockdown from today; In the house within five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.