शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

मृदंगाच्या निनादात चिमुकल्यांची दिंडी

By admin | Updated: July 12, 2014 01:13 IST

बीड: आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेतील बाल गोपाळांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून गावातून दिंडी काढली. १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

बीड: आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेतील बाल गोपाळांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून गावातून दिंडी काढली. १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात जिल्ह्यातील सर्वच शाळांचा सहभाग होता. मृदंगाचा निनाद व ज्ञानोबा-तुकाराम चा जयघोष सगळीकडे घुमत असल्याने बुधवारी सकाळी जिल्हयात सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण झाले होते.माध्यमिक विद्यालय, धोंडराईगेवराई तालुक्यातील धोंडराई येथील माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये अभंग, गौळण, भारूड आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक भक्तराज पौळ, बहीर, सागडे, देशपांडे, पाठक यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयबीड येथील राष्टी्रय माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवारी शहरातून दिंडी काढण्यात आली. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आगवान यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळा, मस्साजोगकेज तालुक्यातील मस्साजोग येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून गावातून वारकरी दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी खांद्यावर पताका घेऊन टाळ- मृदंगासह विठू नामाचा जयघोष केला. यावेळी मुख्याध्यापक कोतींब्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी पालक यांची उपस्थिती होती.जिल्हा परिषद मुर्शदपूरबीड तालुक्यातील मुर्शदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने स्काऊट विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीक्षेत्र नारायणगड येथे स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी उपस्थित भाविकांची आरोग्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. यामध्ये निर्माल्याची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची काळजी आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी गाईडस् अनिता जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.माऊली प्राथमिक विद्यालयबीड शहरातील माऊली प्राथमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त शहरातून विद्यार्थ्यांनी दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती. शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)