शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती वाटपात लाखोंचा घोटाळा !

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

सोमनाथ खताळ , बीड समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते मात्र यामध्ये लाखो रूपयांचा घोटाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोमनाथ खताळ , बीडसमाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते मात्र यामध्ये लाखो रूपयांचा घोटाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिष्यवृत्तीच्या वाटपात नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत संबंधित शाळांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून लाखो रूपयांचा निधी हडप केल्याची तक्रार मनविसेने केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचली की नाही, याचा पुरावा सुद्धा समाजकल्याणकडे उपलब्ध नसल्याने संशय व्यक्त होत आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुलींना समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप प्रत्येक वर्षी करण्यात येते. २००३-०४ मध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू झाली. या शिष्यवृत्ती अंतर्गत अनुसूचित जाती व व्ही.जे.एन.टी. प्रवर्गातील पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थिनींना दहा महिन्यासाठी प्रती महिना ६०० तर ८ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना दहा महिन्यासाठी प्रती महिना १०० रूपयाची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र प्रत्यक्षात ही शिष्यवृत्ती या विद्यार्र्थिनींपर्यंत पोहचत नाही. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचे दस्तावेज समाजकल्याण कार्यालयात आणून जमा करतात, आणि आलेला लाखो रूपयांचा निधी स्वत:च्या खिशात घालत असल्याची तक्रार मनविसेचे शैलेश जाधव यांनी समाजकल्याणकडे दिलेला निवेदनात केली आहे.विशेष म्हणजे मागील तीन वर्षापासूनच्या निधीचा घोळही समाजकल्याण अधिकाऱ्यांना अद्याप निघालेला नाही. २०११-१२ चा निधी २०१०-११ ला, २०१२-१३ चा निधी २०११-१२ ला वाटप करण्याचा महाप्रताप येथील अधिकारी करीत असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक वर्षातील आलेली शिष्यवृत्ती त्या- त्या वर्षात का वाटप केली जात नाही? मागच्या वर्षाचा निधी जातो कोठे? यासारख्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे समाजकल्याणकडे उपलब्ध नाहीत. आम्हाला वेळ नाही तपासायलायासंदर्भात सहायक आयूक्त आर.एम. शिंदे म्हणाले एवढे तपासायला आम्हाला वेळ नाही. असे घोटाळे होत असतील मी नवीनच आहे, असे सांगून त्यांनी हात झटकले. आमच्याकडे शिष्यवृत्ती वाटपाची माहिती उपलब्ध नाही, असे सांगून त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली़सेम टू सेम!२०११-१२ मधील काही शाळांच्या प्रस्तावाची यादी ‘लोकमत’च्या हाती लागली. यामध्ये अनेक विद्यार्र्थिनींच्या स्वाक्षऱ्या, पेन व अक्षर हे ‘सेम’ असल्याचे निदर्शनास आले. यावरून संस्थाचालक, मुख्याध्यापक, कर्मचारी यांनी मिलीभगत करून विद्यार्थिनींच्या शिष्यवृत्तीचा लाखो रूपयांचा निधी हडप केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वाक्षरी एकाच अक्षरात आणि सारखी असू शकत नाही, यामध्ये घोटाळा असून यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे असा आरोपही मनविसेचे शैलेश जाधव यांनी केला आहे.