शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दूध बंद, पाण्याचा रतीब सुरू !

By admin | Updated: February 9, 2016 00:30 IST

टीम लोकमत , बीड खेडी अन् पाणीटंचाई हे काही नवे चित्र नाही; परंतु पाण्यासारखा पैसा ओतून पाच पाणी योजना राबविल्या तरी महिलांच्या डोक्यावरील हंडा काही हटला नाही.

टीम लोकमत , बीडखेडी अन् पाणीटंचाई हे काही नवे चित्र नाही; परंतु पाण्यासारखा पैसा ओतून पाच पाणी योजना राबविल्या तरी महिलांच्या डोक्यावरील हंडा काही हटला नाही... गावात जेवढ्या गल्ल्या, मोहल्ले... त्या सर्वांना स्वतंत्र हातपंप... त्यांची संख्या दोन डझनवर; पण ठणठणाट कायमच...! एकवेळ दुधाशिवाय निभावता येईल; परंतु पाणी मिळाले नाही तर जगायचे कसे, हा यक्षप्रश्न! त्यामुळे दूध बंद करून पाण्याचा रतीब लावण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. ‘लोकमत’च्या ‘स्पॉट रिपोर्टिंग’ मध्ये मादळमोहीकरांनी समस्यांचा पाढाच वाचला.मादळमोही हे जि.प. गटाचे गाव उपबाजारपेठेमुळे तालुक्यात प्रसिद्ध आहे. गावात मोहिमातेचे पुरातन मंदिर आहे. कल्याण - विशाखापट्टणम महामार्ग गावातून गेल्याने उपबाजारपेठेने बाळसे धरले आहे. १३ हजार लोकसंख्येच्या या गावात फेब्रुवारीमध्येच पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. गावातील सार्वजनिक विहिरी, हातपंप, विद्युतपंप यापैकी कशालाही पाणी नाही. पारंपरिक आडही आटले आहेत. पाण्याचे मुख्य स्रोत उसासे टाकत असल्यामुळे पाण्यासाठी रानोमाळ पायपीट करण्याशिवाय नागरिकांना पर्यायच उरला नाही. ज्याच्याकडे थोडेफार पाणी आहे, त्याने टंचाईच्या परिस्थितीचा फायदा घेत पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. ५०० लिटर पाण्यासाठी १०० रुपये दर ठरलेला आहे. गावातील जवळपास १ हजार पशुधनालाही पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. रामजी भुजबळ, राजाभाऊ झिंगरे, किसन कातोळे, डॉ. शहाजी शेळके आदींनी ‘लोकमत’जवळ समस्या आणि अपेक्षा मांडल्या.पाण्याचे मोल काय असते याची प्रचिती गावात गेल्यावरच कळते. ज्याला त्याला पाण्याचीच चिंता. कुणी बैलगाडीतून, कुणी वाहनातून, तर काही जण दुचाकीवरून पाणी वाहताना दिसतात. ‘साहेब, पाण्याचं विचारू नका. दुधाचा रतीब बंद केला अन् पाण्याचा लावला’, अशा शब्दांत काठी टेकवत आलेल्या वृद्धाने आपली वेदना व्यक्त केली. दिवस उगवला की, सारी कामे सोडून पाण्याची व्यवस्था करावी लागते, असे गणेश तळेकर म्हणाले.मुरली खंडागळे म्हणाले, आतापर्यंत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले, दुष्काळही जवळून पाहिला; पण एवढी वाईट परिस्थिती कधी आली नव्हती. गयाबाई तळेकर म्हणाल्या, सारा वेळ पाण्याची तजवीज करताना घरातील कामे बाजूला पडतात.प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६ उपकेंद्रे येतात. ३९ गावांचे कार्यक्षेत्र या आरोग्य केंद्रांतर्गत येते. केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असून इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तसेच रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. येथील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहण्यास उदासीन आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या असून झाडेही वाळलेले आहेत. आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २ कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.टी.लांजेवार यांनी सांगितले.