शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

माडज येथील युवक चोरी प्रकरणात जेरबंद

By admin | Updated: July 8, 2016 00:36 IST

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील माडज येथे ४ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या किराणा दुकानातील चोरी प्रकरणात गावातीलच एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे़

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील माडज येथे ४ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या किराणा दुकानातील चोरी प्रकरणात गावातीलच एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे़ त्याच्याकडून चोरीतील दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत़ तर चोरीची दुचाकी वापरणाऱ्या अंबेजवळगा (ता़उस्मानाबाद) येथील एकास दुचाकीसह पोलिसांनी गजाआड केले़ ही कारवाई बुधवारी करण्यात आली़उमरगा तालुक्यातील माडज येथील सुरेश यशवंतराव पाटील यांचे गावातील शिवाजी चौकात किराणा दुकान आहे़ भरवस्तीतील किराणा दुकान ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले़ चोरट्यांनी दुकानातील १ लाख ५० हजाराचे किराणा साहित्य आणि दोन मोबाईल असा जवळपास १ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता़ याबाबत सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ दिपाली घाडगे-घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, पोउपनि आवटे, पोना मुल्ला, कळसाईन, सुरवसे यांनी माडज येथीलच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली देवून चोरीतील दोन मोबाईल पोलिसांना दिले़ त्याला ताब्यात घेवून उमरगा पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी) अंबेजवळगा येथील एकाकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती स्थागुशाला मिळाली होती़ या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, पोउपनि आवटे, हवालदार जगताप, घुगे, पोना समाधान वाघमारे, कोळी, पोकॉ दसवंत यांनी दत्ता दिगंबर पवार (रा़ अंबेजवळगा तांडा) याला ताब्यात घेतले़ चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येवू लागल्याने पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह दत्ता पवार याला गजाआड केले. पुढील कारवाईसाठी पवार यास ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.