दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांचे परजिल्ह्यात स्थलांतर

By Admin | Updated: August 25, 2014 01:39 IST2014-08-25T00:09:34+5:302014-08-25T01:39:13+5:30

विनोद नरसाळे , कोळगाव गेवराई तालुका व परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे़ यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पाऊस नसल्या कारणाने पिके उगवलीच नाहीत़

Migrant laborers shifted due to drought situation | दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांचे परजिल्ह्यात स्थलांतर

दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांचे परजिल्ह्यात स्थलांतर


विनोद नरसाळे , कोळगाव
गेवराई तालुका व परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे़ यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पाऊस नसल्या कारणाने पिके उगवलीच नाहीत़ हाताला काम मिळत नसल्याने मजूर इतर जिल्ह्यात स्थलांतर करीत आहेत़
२०१२ मध्ये जिल्ह्यात दुष्काळ पडला होता़ त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता़ त्याचा परिणाम शेतामध्ये काम करणाऱ्या मजूरांवर झाला होता़ २०१३ मध्ये पाऊस झाला मात्र गारपिटीमुळे पिके वाया गेली़ यंदा जून महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे़ काही भाग सोडता अनेक ठिकाणी अत्यल्प पाऊस झालेला आहे़ आता पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे़ त्यात पिके कशी जगणार, वाढणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़
पिके येणारच नसल्याने मजूरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ पुढील काळात आपला काम मिळणार नाही ही भीती त्यांना असल्या कारणाने अनेक जण मुंबई, पुणे व पश्चिम महाराष्ट्र या भागात मोलमजुरी करण्यास प्राधान्य देत आहेत़ जवळपास ४०० हून अधिक जणांनी स्थलांतर केली असल्याची बाब समोर आली आहे़
दरम्यान, शेतामध्ये काम करण्याऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे़ त्यातच निसर्गाने साथ न दिल्यामुळे पिके वाया गेली आहेत़ जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहिली तर चांगला पाऊस झाला तर पुन्हा मजूर मिळण्याची शक्यता कमीच आहे़ कारण एक वर्षापूर्वीच दुष्काळ पडला होता़ त्यानंतर आता पुन्हा दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर आहे़ यामुळे गेल्या काही दिवसापासून मजूरांचे स्थलांतर वाढले आहे़

Web Title: Migrant laborers shifted due to drought situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.