शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

महापौर रुसल्या अन् कोपऱ्यात बसल्या !

By admin | Updated: August 15, 2014 01:33 IST

लातूर : दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपात करण्यात आले होते.

लातूर : दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपात करण्यात आले होते. मात्र ११ वाजेपर्यंत महापौर मनपात आल्या नसल्याने उपस्थितांनी विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तेवढ्यात महापौरांचा मनपात प्रवेश झाला. संतप्त झालेल्या महापौरांनी आजचा अभिवादन कार्यक्रम तुम्ही केलात उद्याचे ध्वजारोहणही तुम्हीच करा, अशी भुमिका घेतल्याने दिवसभर नगरसेवकांनी मनधरणी केली़ शेवटी शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी मध्यस्थी केल्यानंतर महापौरांची नाराजी दूर झाली़ महापौर येण्याअगोदरच कार्यक्रम सुरू झाल्याचे पाहताच त्या थेट आपल्या कक्षात गेल्या अन् बाजूची साधी खुर्ची घेऊन बसल्या. आपला अवमान झाल्याचे लक्षात आल्याने त्या अभिवादन कार्यक्रमाकडे तब्बल तीन तासांनी आल्या अन् अभिवादन करून निघून गेल्या़ लातूर शहर महानगरपालिकेत विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुतांश नगरसेवक ११ वाजण्याच्या अगोदरच मनपात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी दामाजी सोनफुले यांच्याकडे होते. ११ वाजून गेले तरी महापौर आल्या नसल्याने त्यांच्या गैरहजेरीतच कार्यक्रमाला सुरुवात झाली. नगरसेवकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ४ ते ५ मिनीट उशिरा आलेल्या महापौर थेट आपल्या कक्षात जावून बसल्या़ या घटनेची चर्चा दिवसभर सुरू होती़ महापौर पदाचा सन्मान राखायला हवा. प्रोटोकॉलप्रमाणे प्रतीक्षा करायला हवी होती. मात्र गुरुवारी मनपात झालेल्या कार्यक्रमात तसे झाले नाही. चुकीचा पायंडा पडू नये, यासाठी आपण अशी भूमिका घेतल्याचे महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी ध्वजारोहण करणार नसल्याची भूमिका महापौरांनी घेतल्याने पक्षश्रेष्ठींची पंचाईत झाली.