लग्नाच्या आमिषाने विवाहितेस पळविले

By Admin | Updated: January 18, 2015 00:31 IST2015-01-18T00:03:57+5:302015-01-18T00:31:53+5:30

तलवाडा : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेला पळवून नेल्याची घटना शनिवारी ठाकर आडगाव (ता़ गेवराई) येथे उघडकीस आली़ याप्रकरणी तिघांविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला़

Married to the marriage bait | लग्नाच्या आमिषाने विवाहितेस पळविले

लग्नाच्या आमिषाने विवाहितेस पळविले


तलवाडा : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेला पळवून नेल्याची घटना शनिवारी ठाकर आडगाव (ता़ गेवराई) येथे उघडकीस आली़ याप्रकरणी तिघांविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला़
ज्ञानेश्वर महादेव गाडे, मच्छिंद्र राजाराम कोकाट, गणेश कचरू जंगले (सर्व रा़ ठाकर आडगाव) अशी आरोपींची नावे आहेत़ विवाहितेच्या मामाने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सदरील विवाहिता शुक्रवारी रात्री नऊ वाजता शौचासाठी घराबाहेर पडली होती़ यावेळी ज्ञानेश्वर गाडे याने तिला गाठले़ चाकूचा धाक दाखवून मी तुझ्याशी लग्न करतो, असे म्हणत धमक्या देत पळवून नेले़ या घटनेने खळबळ उडाली आहे़
दरम्यान, दोन दिवस उलटूनही पोलिसांना अपहृत विवाहिता व आरोपी सापडलेले नाहीत़ नातेवाईक व पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Married to the marriage bait