शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

तीन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: May 24, 2016 01:03 IST

लोहा : लोहा तालुक्यातील कपिलेश्वर सांगवी येथील एका विवाहितेने घरगूती कारणावरून ३ चिमुकल्यांसह विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी सायंकाळी घडली.

लोहा : लोहा तालुक्यातील कपिलेश्वर सांगवी येथील एका विवाहितेने घरगूती कारणावरून ३ चिमुकल्यांसह विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी सायंकाळी घडली. दरम्यान, या घटनेची माहिती रात्री उशिरा पालिसांना मिळाली. रात्री १२ वाजेपर्यंत याप्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या संदर्भात सोनखेड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सांगितलेले घरातील काम पती ऐकत नाहीत, शाब्दीक चकमकीच्या कारणावरुन विवाहिता प्रियंका माधव वानखेडे (वय २८, रा. कपिलेश्वर सांगवी, ता. लोहा, जि. नांदेड) हिने साक्षी माधव वानखेडे (वय ६), कपिल माधव वानखेडे (वय ५), प्रतिक माधव वानखेडे (वय ३) यांच्यासह गावाशेजारील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. पती माधव वानखेडे हे सतत कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. सोमवारी सायंकाळी पत्नी प्रियंकाने मुलगी साक्षी हीस वडिलांस घरी बोलावून आणण्यास सांगितले असता, मित्रासमवेत गप्पा मारत असल्याने घराकडे पती आले नसल्याचा क्षुल्लक राग मनात ठेवून तिन्ही मुलांसमवेत गावाशेजारील भानुदास रामजी वानखेडे यांच्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. रागाच्या भरात तीन मुलांसह विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. (वार्ताहर) नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मध्यरात्री १२ वाजता चारही मृतदेह आणण्यात आले. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन होईल. नातेवाईकांचा जबाब नोंदवणे व पंचनामाही सुरू आहे, अशी माहिती सोनखेड ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल वेदपाठक, डोईबळे, तांबोळी, कारामुंगे,हंबर्डे यांनी रात्री उशिरा दिली.