प्रतापराव बोराडे आणि नागनाथ कोत्तापल्ले यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 19:22 IST2021-01-21T19:17:58+5:302021-01-21T19:22:48+5:30

कोरोनामुळे २०२० या वर्षासाठीचा जीवनगौरव पुरस्कार देता आला नाही.

Marathwada Sahitya Parishad Lifetime Achievement Award to Prataprao Borade, Nagnath Kottapalle | प्रतापराव बोराडे आणि नागनाथ कोत्तापल्ले यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

प्रतापराव बोराडे आणि नागनाथ कोत्तापल्ले यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

ठळक मुद्दे२०२० या वर्षीचा पुरस्कार प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना तर२०२१ या वर्षीचा पुरस्कार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना देण्यात येणार

औरंगाबाद : मराठवाडासाहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्राचार्य प्रतापराव बोराडे आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर झाला आहे. 

कोरोनामुळे २०२० या वर्षासाठीचा जीवनगौरव पुरस्कार देता आला नाही. त्यामुळे २०२० या वर्षीचा पुरस्कार प्राचार्य बोराडे यांना, तर २०२१ या वर्षीचा पुरस्कार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना देण्यात येणार आहे. या दोघांनीही साहित्य परिषदेच्या उभारणीत केलेले कार्य, त्यांचे दिर्घकाळापासून परिषदेशी असलेले निकटचे संबंध यांची नोंद व त्यांच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून परिषदेच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत दि. १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, याविषयीची घोषणा ठाले पाटील यांनी दि. २१ जानेवारी रोजी केली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Marathwada Sahitya Parishad Lifetime Achievement Award to Prataprao Borade, Nagnath Kottapalle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.