Maratha Reservation: काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा, मराठवाड्यातील आमदारांचं राजीनामा सत्र सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 20:57 IST2018-07-30T20:45:43+5:302018-07-30T20:57:06+5:30
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. अनेक आंदोलनांना हिंसक वळणही लागलंय, तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत जवळपास 5 आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

Maratha Reservation: काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा, मराठवाड्यातील आमदारांचं राजीनामा सत्र सुरूच
सिल्लोड (औरंगाबाद ) : मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राजीनामा दिला. विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला.
सत्तार यांनी मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा करून हा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणचा मुद्दा सध्दा पेटलेला असताना भाजप सरकार मराठा आरक्षणाला बगल देत असल्याची भावना निर्माण झाली आहे. हे सरकार मराठा आरक्षणासह इतर सर्वच पातळ्यावर अपयशी ठरले आहे. यामुळे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सत्तार यांनी सांगितले.
जनतेच्या मागण्यांना न्याय देऊ शकलो नाही
मला जनतेने निवडून दिले आहे. त्यांच्या मागण्यांना आमदार असताना न्याय देऊ शकलो नाही. यामुळे मी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ही स्टंट बाजी नसून मी प्रधान सचिव कडे राजीनामा दिला तो मंजूर करावा.