शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
2
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
3
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
4
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
5
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
6
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
7
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
8
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
9
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
10
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
11
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
12
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
13
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
15
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
16
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
17
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
18
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
19
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
20
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
Daily Top 2Weekly Top 5

महिलांमध्ये दहशत माजविणाऱ्या मंगळसूत्र चोरांचे त्रिकूट जेरबंद

By admin | Updated: December 7, 2014 00:19 IST

औरंगाबाद : महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ही दहशत निर्माण करण्यात मोठा वाटा असणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले.

औरंगाबाद : गेल्या वर्षभरात मंगळसूत्र चोरांनी महिलांना घराबाहेर दागिने घालून फिरणे मुश्कील करून टाकले होते. मंगळसूत्र चोरीच्या वाढलेल्या घटनांमुळे महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ही दहशत निर्माण करण्यात मोठा वाटा असणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले. या टोळीतील विलास ऊर्फ पप्पू शंकर कांबळे (२७, रा. मिटमिटा), योगेश नारायण झळके (२७, रा. वळदगाव), विजय काशीनाथ गंगावणे (२२, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी शहरात आतापर्यंत केलेल्या तब्बल ४४ मंगळसूत्र चोरीच्या घटनांची कबुली दिली आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून शहरात मंगळसूत्र चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातलेला होता. दर एक-दोन दिवसांआड शहरात कोठे ना कोठे अशी घटना घडत होती. या सत्रामागे वरील त्रिकुटाचा हात आहे, अशी माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांना कळविली. माहिती मिळताच शोध घेऊन या तिन्ही आरोपींना अटक करण्यातआली. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस केल्यानंतर वरील आरोपींनी दोन, चार नव्हे, तर ४४ मंगळसूत्रचोरीची कबुली दिली. विशेष म्हणजे कोठून कधी मंगळसूत्र हिसकावले ती सर्व ठिकाणेही त्यांनी दाखविली. आतापर्यंत पोलिसांनी आरोपींकडून २० मंगळसूत्र हस्तगत केलेआहेत. या आरोपींकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.