औरंगाबादमध्ये दोन मुली आणि पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 13:59 IST2018-08-31T13:47:31+5:302018-08-31T13:59:25+5:30

फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

man killed his family in aurangabad | औरंगाबादमध्ये दोन मुली आणि पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

औरंगाबादमध्ये दोन मुली आणि पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

औरंगाबाद - फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुली व पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

कृष्णा तायेराव देवरे (30) याने सर्वदा कृष्णा देवरे (6), हिंदवी कृष्णा देवरे (4) आणि पत्नी शिवकन्या देवरे (27) यांची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून ही हत्या आणि आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
 

Web Title: man killed his family in aurangabad