लॉकडाऊन कालावधीत चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:07 IST2020-12-09T19:06:07+5:302020-12-09T19:07:30+5:30
गर्भवती असल्याचे समोर आल्यावर तिची फिर्याद नोंदवून घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली

लॉकडाऊन कालावधीत चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक
ठळक मुद्दे भीतीपोटी तिने हा प्रकार कुणाला सांगितला नाही.
औरंगाबाद : लॉकडाऊन कालावधीत १७ वर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली. भीतीपोटी तिने हा प्रकार कुणाला सांगितला नाही.
दरम्यान, ती गर्भवती असल्याचे समोर आल्यावर तिची फिर्याद नोंदवून घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडितेचे पोट दुखत असल्यामुळे तिला सोमवारी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितल्याने तिच्यासह नातेवाईकांच्या पायाखालची वाळू घसरली. या घटनेची एमएलसी पोलिसांना प्राप्त होताच महिला पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. तेव्हा आरोपी चुलत भावाचे नाव समोर आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.