- श्रीकांत पोफळे
करमाड: जालना महामार्गावरील लाडगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियमची गॅस पाईपलाईन फुटल्याने मोठी आग लागली. ही पाईपलाईन डीएमआयसी (DMIC) क्षेत्राला गॅस पुरवठा करते. पाईपलाईनमधील अतिप्रेशरमुळे आगीचे लोळ तब्बल २० फुटांपर्यंत उंच जात होते, ज्यामुळे परिसरातील विद्युत तारा गरम होऊन तुटून पडल्या.
तरुणांच्या तत्परतेने टळला अनर्थपहाटेच्या शांततेत अचानक आगीचे रौद्र रूप पाहून लाडगाव येथील तरुणांनी तातडीने हालचाल केली. त्यांनी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून गॅस पुरवठा बंद करण्याची सूचना दिली आणि अग्निशामक दलाला पाचारण केले. एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या एका बंबाने शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने, वेळीच पुरवठा बंद झाल्याने मोठा स्फोट किंवा जीवितहानी टळली आहे.
घरोघरी असलेल्या पाईपलाईनमुळे भीतीलाडगाव परिसरात सध्या घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जातो. ज्या पंपावरून पश्चिमेला गावासाठी आणि पूर्वेला एमआयडीसीसाठी पुरवठा होतो, तिथेच हा बिघाड झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या एमआयडीसीकडे जाणारा पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.
"पाईपलाईनवर असलेला कचरा कोणीतरी जाळल्यामुळे किंवा अनावधानाने लागलेल्या आगीमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. ज्या ठिकाणी आग लागली, तिथल्या चेंबरच्या झाकणातून उष्णता खाली पोहोचल्याने पाईपलाईनला किरकोळ गळती (लीकेज) झाली असावी. मात्र, लाडगावकरांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. घरगुती वापरासाठीचा (स्वयंपाकाचा) गॅस पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे." — मनोज जाधव (बिझनेस हेड)
Web Summary : A gas pipeline fire erupted near Jalna, Ladgaon, due to a leak. Prompt action by local youth and firefighters contained the blaze, preventing a major explosion and potential casualties. Gas supply suspended; repairs underway.
Web Summary : जालना, लाडगाँव के पास गैस पाइपलाइन में रिसाव के कारण आग लग गई। स्थानीय युवाओं और दमकल कर्मियों की त्वरित कार्रवाई से आग पर काबू पाया गया, जिससे एक बड़ा विस्फोट और संभावित हताहत होने से बच गए। गैस की आपूर्ति निलंबित; मरम्मत जारी।