शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात शिवसेनेवर सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:34 IST

वैजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता.

ठळक मुद्देशिवसेनेतील एक गट मुंबईत तळ ठोकून१९९९ ते २००९ पर्यंत वाणी यांनी सलग तीनवेळा येथे भगवा फडकवला.

वैजापूर : १९९९ पासून वैजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिराज्य होते. आर. एम. वाणी यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून हॅट्ट्रिक साधली होती; परंतु २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि या निवडणुकीत त्यांची प्रकृती बरी नसल्याचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली आहे. परिणामी, शिवसेनेवर आता उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. 

वैजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. १९९९ ते २००९ पर्यंत वाणी यांनी सलग तीनवेळा येथे भगवा फडकवला. गेल्या वेळी मात्र त्यांचा पराभव झाला होता, तर काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे वाणी यांनी जाहीर केले होते. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून लोकसभा निवडणुकीत सेनेला येथून चांगले मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे शिवसेना ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, हे निश्चित आहे.दरम्यान, वाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सेनेकडे दुसरा प्रभावी असा चेहरा नाही. त्यामुळे सेना नेतृत्व विरोधकांना चीत करेल, अशा उमेदवाराच्या शोधार्थ आहे, असे असले तरी मतदारसंघातील शिवसैनिक गेल्या तीन दिवसांपासून वाणी यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करीत आहेत, दुसरीकडे, या निवडणुकीत वाणी यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी तालुक्यातील शिवसेनेचा एक गट मुंबईत तळ ठोकून असल्याची चर्चा ऐकायला येत आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना माजी आमदार वाणी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक मी लढवावी यासाठी तालुक्यातील शिवसैनिक आग्रही आहेत. मात्र, निवडणूक न लढवण्याचा, आपण निर्णय घेतला असून, त्यावर मी ठाम आहे. त्यामुळे वैजापूर मतदारसंघात शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना