शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज कायद्याची वाट लावून माफिया गब्बर

By admin | Updated: April 24, 2015 00:35 IST

रवी गात ,अंबड वाळू माफियांचा तालुक्यातील हैदोस सुरुच आहे. वाळूतून मिळणाऱ्या अमाप पैशाच्या लोभापायी वाळू माफियांनी गोदापात्राची अक्षरश: चाळणी केली आहे

रवी गात ,अंबडवाळू माफियांचा तालुक्यातील हैदोस सुरुच आहे. वाळूतून मिळणाऱ्या अमाप पैशाच्या लोभापायी वाळू माफियांनी गोदापात्राची अक्षरश: चाळणी केली आहे. वाळू उपसा करताना गौण खनिज कायद्यातील तरतुदींचे सर्रास उल्लंघन वाळू माफिया करत आहेत. गोदापात्रातून केवळ मनुष्यबळाच्या सहाय्यानेच वाळु उपसा करावा व तो ही जास्तीस जास्त ३ फुटापर्यंतच करावा अशी तरतुद आहे. मात्र प्रत्यक्षात जेसीबी, पोकलंड आदी यंत्रांच्या सहाय्याने गोदापात्रात ३० ते ५० फुटापर्यंतच्या खड्डे खोदुन वाळु उपसा करण्याचे पाप वाळु तस्करांनी करत आहेत. गौणखनिज नियम १९५४ च्या तरतुदीनुसार ज्या व्यक्तीने वाळु उपसा करण्याचा लिलाव मिळविला आहे त्याने केवळ मनुष्य बळाच्या सहाय्याने वाळु उपसा करावा. लिलावधारकाने मजुरांकडुन खोरे, फावडे आदी साहित्यांचा वापर करुन वाळु उपसा करावा, वाहनांमध्ये वाळु भरावी अशी तरतुद या कायद्यात आहे. विशेष म्हणजे वाळु उपसा करताना कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रामध्ये ३ फुटापेक्षा जास्त खोलीचा खड्डा खोदु नये. मोठे खड्डे खोदुन वाळु उपसा केल्यास पर्यावरणास धोका निर्माण होऊन पर्यावरणाचे नुकसान होते.या नियमातील अन्य तरतुदीनुसार लिलावधारकाने जेथे वाळु उत्खनन चालु आहे त्या ठिकाणी फलक लावुन उत्खनन क्षेत्राची सीमा दर्शविणारे खांब उभारावे, स्वत:चे व तसेच अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेमलेल्या उप-ठेकेदाराचे नाव, पत्ता व जागेचा तपशील दर्शविणारा फलक योग्य ठिकाणी लावणे बंधनकारक आहे, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी वाळु उत्खनन बंद ठेवणे लिलावधारकास बंधनकारक आहे, लिलावधारकाने वार्षिक पर्यावरणीय अंकेक्षण अहवाल पर्यावरण विभागास सादर करावा, लिलावधारकाने नदीपात्रातील वाळू थराची जाडी सातत्याने राहण्यासाठी बेंच मार्क निश्चित करुन बेंच मार्कच्या खाली कोणत्याही परिस्थितीत उत्खनन करु नये, वाळूचे उत्खनन केवळ सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीतच करता येईल, वाळुची वाहतुक करताना वाहनातील वाळु प्लॉस्टीक पेपरने, ताडपत्रीने आच्छादीत करुनच वाळुची वाहतुक करणे बंधनकारक आहे.वाळू उत्खनन मंजुर क्षेत्रापैकी कमीत कमी २० टक्के क्षेत्रापैकी नदीतीरावर तसेच वाहतूक रस्त्यालगत झाडे लावुन हरियाली(ग्रीन बेल्ट) वाळुघाटाच्या बाजुला झाडे लावुन हरीत पट्टा निर्माण करणे बंधनकारक आहे अशा विविध तरतुदींचा या कायद्यात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे तालुक्यात एकूण ३४ वाळुघाट असुन त्यापैकी केवळ १३ वाळुघाटांचा लिलाव झालेला आहे, तर दोन वाळुघाटांना मुदतवाढ मिळालेली आहे. यापैकी एकाही वाळुघाटातुन अद्याप वाळु उपसा सुरु करण्यात आला नसल्याची शासकीय नोंद आहे. (वार्ताहर)पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. वाळू माफियांच्या कारवायांना व अरेरावीला गोदाकाठच्या गावातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून स्वत: ज्योतिप्रिया सिंग यांनी रात्रीच्या वेळी या भागात अचानक भेट देऊन या भागात होणारी वाळू तस्करी स्वत: पाहावी व वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांमधून होत आहे.