मुंबईचे प्रेमीयुगुल फुलंब्री पोलिसांच्या जाळ्यात

By Admin | Updated: August 20, 2014 00:59 IST2014-08-20T00:31:48+5:302014-08-20T00:59:46+5:30

फुलंब्री : मुंबई येथून फरार झालेल्या प्रेमीयुगुलाला फुलंब्री पोलिसांनी शिताफीने पकडले व मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले.

The lover of Mumbai's lover of Fulmuri police | मुंबईचे प्रेमीयुगुल फुलंब्री पोलिसांच्या जाळ्यात

मुंबईचे प्रेमीयुगुल फुलंब्री पोलिसांच्या जाळ्यात

फुलंब्री : मुंबई येथून फरार झालेल्या प्रेमीयुगुलाला फुलंब्री पोलिसांनी शिताफीने पकडले व मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले.
संजय दगडू मोटे हा २१ वर्षीय तरुण पिशोर येथील रहिवासी आहे. तो काही वर्षांपासून नेरूळ मुंबई येथे एका हॉटेलवर कामाला लागला. नजीकच राहणाऱ्या एका सतरा वर्षीय युवतीसोबत त्याचे सुत जुळले. १४ आॅगस्ट रोजी दोघे तेथून फरार झाले. १६ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते दोघे फुलंब्री टी पॉर्इंटवर फिरत असताना त्यांना रात्री गस्तीवरील पोलिसांनी अटक केली. आम्ही दोघे बहीण-भाऊ आहोत, अशी खोटी माहिती देत पळून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता पोलिसांना संशय आला. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, जमादार आसाराम आगळे यांनी पोलिसाचा खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी सर्व माहिती सांगितली. फुलंब्री पोलिसांनी याची माहिती नेरूळ पोलीस ठाण्यात दिली. तेथे मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली होती. दुसऱ्या दिवशी नेरूळ पोलिसांनी फुलंब्रीत येऊन त्या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले.

Web Title: The lover of Mumbai's lover of Fulmuri police