शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला विद्यार्थ्याकडे सापडले हिंदीत लिहिलेले प्रेमपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:20 IST

दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकारासाठी तेलवाडी तांड्यावरील या केंद्राचे नाव अगोदरही बरेच गाजले होते.

ठळक मुद्देमंगळवारी भरारी पथकाने जिल्ह्यात तब्बल ११ कॉपीबहाद्दरांविरुद्ध कारवाई केली. 

औरंगाबाद : मंगळवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने जिल्ह्यात ११ कॉपीबहाद्दरांना पकडले. दरम्यान, एका ठिकाणी विद्यार्थ्याकडे चक्क प्रेमपत्र आढळून आल्याचे पाहून शिक्षणाधिकाऱ्यांनी डोक्यालाच हात लावला.

सध्या १० वी, १२ वीच्या परीक्षेचा फिव्हर सुरू आहे. शिक्षण विभागाची संपूर्ण यंत्रणा परीक्षेत मग्न आहे. दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासाबरोबर परीक्षेचे दडपण आहे, तर कॉपी बहाद्दर परीक्षार्थी भरारी पथकाच्या रडारवर आहेत.

कन्नड तालुक्यातील तेलवाडी येथील परीक्षा केंद्र हे बोर्डाने उपद्रवी केंद्र म्हणून घोषित केले आहे. मंगळवारी इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथक तेलवाडी तांड्यावरील परीक्षा केंद्रावर पोहोचले. 

भरारी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची झाडाझडती घेतली तेव्हा या परीक्षा केंद्रावर एक अफलातून कॉपीबहाद्दर पकडण्यात आला. त्या कॉपीबहाद्दराकडे चक्क प्रेमपत्रच सापडले. परीक्षेच्या दिवसांत रात्ररात्र जागून विद्यार्थी अभ्यास करतात, काही जण कॉपी लिहिण्याची मेहनतही घेत असतात; पण या विद्यार्थ्याने रात्रभर जागून चक्क प्रेमाचा स्वीकार कर, अशी हाक देणारे प्रेमपत्र लिहून ते परीक्षेला येताना सोबत आणल्याचे आढळून आले. यंदापासून दहावीच्या प्रश्नपत्रिका या कृतिपत्रिकेच्या स्वरूपात आहेत. तेलवाडी तांड्यावरील परीक्षा केंद्रात या विद्यार्थ्याकडे कृतिपत्रिकेसोबत प्रेमपत्र पाहून शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण हे तर आवाक् झाले.

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकAurangabadऔरंगाबाद