शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बागायती अनुदानाला खो

By admin | Updated: May 31, 2016 23:14 IST

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड बागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीडबागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी याबाबत काहीच बोलत नसल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांना खोट्या आश्वासनावरच समाधान मानावे लागत आहे.नापिकी व कर्ज बाजारीपणाच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला सरकारचा दुष्काळी अनुदानाच्या रूपाने आधार दिल्याचा बोलबाला सत्ताधाऱ्यांनी केला. बागायती असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रूपये अनुदान देऊ अशी घोषणा तीन महिन्यांपूर्वी सरकारने केली. दुष्काळी अनुदान तीन टप्यात वाटप होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले होते. यामध्ये कोरडवाहूसाठी हेक्टरी साडेसहा हजार, बागायतीसाठी हेक्टरी दहा हजार तर फळ बागांसाठी हेक्टरी अठरा हजाराच्या जवळपास अनुदान देण्याची घोषणा झाली होती. यामध्ये कोरडवाहू असलेले दोन लाख शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. बागायतीच व फळबागांचे दुष्काळी अनुदान आले नसल्याचे जिल्हा प्रशासनातील संबंधीत अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवर फळबागा आहेत. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या बागा पाण्याअभावी तोडून टाकाव्या लागल्या. या नुकसानीची भरपाई मिळेल या आशेवर असलेल्या बळीराजाची निराशाच झाली.८५ कोटींची मागणी : असे आहे क्षेत्र...कोरडवाहूनचे दोन लाख शेतकरी दुष्काळापासून वंचित राहिलेले आहेत तर बागायती असलेल्या १ लाख ४३ हजार ६६३ हेक्टर तर जिल्हयात १३ हजार हेक्टर एवढे फळबागाचे क्षेत्र आहे. बीड, धारूर, गेवराई, अंबाजोगाई व परळी तालुक्यात फळबागांचे पाण्याअभावी सरपन झालेले आहे. नुकसानीची भरपाई मात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर पेरणीसाठी अनुदानाचे पैसे बळीराजाच्या उपयोगी पडले असते, मात्र शासनाकडूनच पैसे मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनही हतबल आहे.